तांत्रिक कौशल्ये आणि जीवन कौशल्ये (Hard and Soft Skills):
समजा रमेश आणि सुरेश दोघेही प्रसिद्ध डॉक्टर आहेत ते वेगवेगळ्या रोगांसाठी योग्यरित्या निदान आणि औषधोपचार करतात. त्यांची मनोवृत्ती आणि व्यक्तिमत्त्वांकडे पाहता, रमेश गर्विष्ठ, तापट आणि स्वतःचेच खर म्हणणारा असा आहे. रुग्णांवर उपचार करताना भावनांचा विचार करू नये असे डॉ. रमेशला वाटते. याउलट, डॉ. सुरेश रुग्णांबद्दल सहानुभूती आणि दया दाखवतो, तो त्यांना धीर देतो, त्यांना तणाव मुक्त करतो, त्यांच्याशी चर्चा करतो, त्यांच्या अतार्किक शंका दूर करतो आणि रुग्णांशी मैत्री करतो. आपणास दोघांपैकी दीर्घकाळापर्यंत डॉक्टर म्हणून कोण अधिक यशस्वी आणि परिणामकारक असेल असे वाटते? तुमचे उत्तर डॉ. सुरेश असेल तर तुम्ही बरोबर आहात डॉ. सुरेश यांनी तांत्रिक आणि जीवन कौशल्यांचे योग्य पद्धतीने उपयोजन केले तर डॉ. रमेश यांनी फक्त तांत्रिक कौशल्ये वापरली आहेत. आपल्याला व्यवसायात तग धरण्यास तांत्रिक कौशल्ये मदत करतात आणि जीवन कौशल्ये ही आपल्याला स्टार परफॉरमर (उत्कृष्ट निष्पादक) बनवतात!
तांत्रिक कौशल्ये आणि जीवन कौशल्ये यामध्ये फरक काय आहे?
तांत्रिक कौशल्ये ही ज्ञानाशी संबधित कौशल्ये आहेत. ती आपणास व्यावसायिक व तांत्रिक क्षेत्रातील तज्ज्ञता प्रदान करतात. त्यांना सामान्यतः 'तांत्रिक कौशल्ये' म्हणून ओळखली जातात. ती कौशल्ये विशिष्ट कार्यक्षेत्राशी संबंधीत असतात. प्रामुख्याने औपचारिक शिक्षण (शाळा आणि उच्च शिक्षण), कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम, मूलभूत ते प्रगत पातळी अभ्यासक्रम, नोकरी प्रशिक्षणार्थी व ऑनलाइन अभ्यासक्रम इत्यादींद्वारे हि कौशल्ये शिकविली जातात. तांत्रिक कौशल्यांना कोणतीही नोकरी मिळविण्यासाठी अत्यावश्यक गरज समजली जाते. दुसरीकडे, जीवन (सॉफ्ट) कौशल्ये आंतर-वैयक्तिक आणि देवाणघेवाणीच्या संबंधीत क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तीच्या अभिवृत्ती आणि व्यक्तिमत्त्वाशी जोडलेल्या आहेत. सामान्यतः जीवन कौशल्ये ही 'अतांत्रिक कौशल्ये' म्हणून ओळखली जातात. जीवनाच्या प्रत्येक कार्यक्षेत्रामध्ये ती कौशल्ये आवश्यक असतात. विशेषतः शाळा आणि महाविद्यालयांमध्ये ही कौशल्ये शिकवली जात नाहीत. निरीक्षण, आत्मनिरीक्षण, प्रयत्न-प्रमाद पध्दती आणि आदर्शाच्या अनुकरणाद्वारे (भूमिका अनुरूपण) सामान्यपणे ही कौशल्ये आत्मसात केली जातात. आजकाल, सॉफ्ट-स्किल्स प्रशिक्षण कार्यक्रम ऑनलाइन देखील उपलब्ध आहेत. जीवन कौशल्ये आपल्याला संस्थेमध्ये एक स्टार कलाकार बनवतात.
आईसबर्ग मॉडेल तांत्रिक कौशल्यांचे आणि जीवन कौशल्यांच्या वैशिष्ट्यांचे वर्णन करते. आपणास हे सहजपणे जाणवेल की इतर लोक तांत्रिक कौशल्य सहजतेने पाहू शकतील ती समुद्र पातळीवरील बर्फाचा पृष्ठभागाच्या वर असतात. तर जीवन कौशल्ये सहजपणे दिसत नाहीत कारण ती अभिवृत्तीच्या स्वरूपात बर्फाच्या पृष्ठभागाखाली लपलेले असतात. ज्ञान आणि तांत्रिक कौशल्ये प्रभावी सादरीकरणासाठी, आपणाकडे आंतर वैयक्तिक आणि सामाजिक कौशल्यांसह उचित अभिवृत्ती आवश्यक असते. यशस्वी आणि परिणामकारक करियरसाठी तांत्रिक कौशल्ये आणि जीवन कौशल्ये महत्त्वाची भूमिका बजावतात.
तांत्रिक कौशल्ये विरुद्ध जीवन कौशल्ये:
तांत्रिक आणि जीवन कौशल्ये यातील भेद पुढील तक्त्यामध्ये स्पष्ट होतो
तांत्रिक कौशल्ये
|
जीवन कौशल्ये
|
· ही कौशल्ये तांत्रिक आणि व्यावसायिक कार्यक्षेत्रांमधील ज्ञान आणि
तज्ञतेच्या विशिष्ट क्षेत्राशी संबंधित असतात.
· डावा मेंदू हा विश्लेषणात्मक आणि
तार्किक प्रक्रियेशी अधिक संबंधित आहे आणि 'बुद्धिमत्तेच्या संकल्पनांचे वर्णन
करण्यासाठी त्याचा वापर केला जातो.
· ही कौशल्ये मूर्त नियम आणि प्रक्रियांवर
आधारित आहेत आणि म्हणून कार्य वातावरण बदलले तरीही ते कायम राहतात.
· ही कौशल्ये सामान्यत: औपचारिक
शिक्षणाद्वारे (शाळा आणि उच्च शिक्षणाद्वारे) शिकविली जातात.
·
आपण ही कौशल्ये अंक, ग्रेड, क्रेडिट्स, प्रमाणपत्रे, पदवी तसेच
व्यावहारिक क्रियांच्या सहाय्याने मोजमाप करू शकतो.
उदाहरणे: टंकलेखन कौशल्ये, संगणक
प्रोग्रामिंग,
वैद्यकीय ज्ञान, अभियांत्रिकी कौशल्ये, लेखांकन आणि लेखापरीक्षा क्षमता, लेखन कौशल्य, अभिनय कौशल्ये, फोटोग्राफीतील
कौशल्ये इ.
· ही कौशल्ये नोकरी आणि पदोन्नतीसाठी आवश्यक असतात.
|
· जीवन कौशल्ये 'अतांत्रिक’ आहेत जी अभिवृत्ती
आणि व्यक्तिमत्त्वाशी संबंधित आहेत. ती वैयक्तिक आणि परस्पर संवादादरम्यान वापरली
जातात आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात ती अत्यावश्यक असतात.
· उजवा मेंदू हा
वैयक्तिक आणि सर्जनशील प्रक्रियेशी अधिक संबंधित आहे आणि 'भावनिक बुद्धिमत्तेच्या
संकल्पनेचे वर्णन करण्यासाठी त्यांचा वापर केला जातो.
· ही कौशल्ये
कामाच्या स्वरूपानुसार आधारित असतात जे वेळोवेळी बदलतात आणि ती संस्थात्मक
संस्कृती आणि सहकार्यांच्या अपेक्षांवर अवलंबून असतात.
· ही कौशल्ये शाळा
आणि महाविद्यालयांमध्ये शिकविली जात नाहीत. त्यांना सामान्यतः प्रयत्न प्रमाद, निरीक्षण, आत्मनिरीक्षण,
स्व-मुल्यांकन, आणि रोल मॉडेल
इत्यादीद्वारे शिकले जाते.
· हही कौशल्ये संख्यात्मक
पद्धतीने मोजणे कठिण आहे. आपण वैयक्तिक कौशल्याच्या माध्यमातून त्यांचे गुणात्मक
निरीक्षण करू शकतो. या कौशल्यांमध्ये सुधारणा होण्यासाठी कर्मचाऱ्यांना अभिप्राय
देण्यासाठी अनेक नवीन साधने आणि चाचण्यांचा वापर केला जातो
उदाहरणे: रीति-रिवाज, सक्रिय ऐकणे, लवचिकता, प्रभावी संवाद, संयम, एकत्रीकरण, सहकार्याची
मनोवृत्ती, नेतृत्व, व्यवस्थापनातील
विविधता, ताण व्यवस्थापन, तणाव अंतर्गत
कार्य करणे इ.
· या कौशल्यांची चाचपणी
मुलाखत तसेच अप्रेंटीसशिप दरम्यान
आणि कनिष्ठ, समवयस्क व वरीष्ठांनी केलेल्या निरीक्षणांच्या
सहाय्याने केले जाऊ शकते.
|
जीवन कौशल्ये का महत्वाची ठरतात?
जागतिकीकरणाच्या युगात, ज्ञान आणि तांत्रिक कौशल्ये (हार्ड कौशल्ये), कितीही महत्त्वाची असली तरी करियरच्या टप्प्यावर पुढे जाण्यासाठी ती पुरेसी नाहीत. नोकरीची बाजारपेठ व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्व आणि अभिवृत्तीशी संबंधित कौशल्ये (जीवन कौशल्ये) यांना समान महत्व देत आहेत. टीमवर्क, प्रकल्प नेतृत्व, सल्ला देणे, नेटवर्किंग, समन्वय यासारखे शब्द बहु-सांस्कृतिक कार्यस्थळांमध्ये बझवर्ड्स बनत आहेत. म्हणूनच, ही दोन्ही कौशल्ये असणारा उमेदवार नियुक्तीसाठी आदर्श ठरतो. उच्च स्तरावरील पदासाठी विशेषतः जीवन कौशल्ये महत्त्वपूर्ण मानली जातात. त्यामुळे संस्थात्मक वातावरण निरोगी रहाते आणि कार्यसंघाची उत्पादकता वाढते. महाविद्यालयीन जीवन हे प्रयोग, अभ्यास आणि कौशल्ये मिळवण्याचा एक योग्य काळ आहे.
समृद्ध करिअर आणि जीवनासाठी खालील काही महत्त्वाच्या कौशल्यांचे पालन करणे आवश्यक आहे:
1. प्रभावी संप्रेषण
संप्रेषण ही मानवाची चौथी मूलभूत गरज असल्याचे मानले जाते. आपण निवडलेल्या क्षेत्राचा विचार न करता संप्रेषण आपल्या जीवन आकांक्षा पूर्ण करण्यासाठी मदत करते. तसेच संप्रेषण आपणास कल्पना आणि सूचना हस्तांतरित करण्यात मदत करते आणि त्याद्वारे कार्य करण्यासाठी कार्यसंघ सदस्यांना अग्रस्थानी ठेऊन अधिकार प्रदान करते. परंतु प्रत्येकाला हे समजले पाहिजे की गुळगुळीत भाषण देणे किंवा आकर्षक शब्द वापरणे परिणामकारक असले तरी दीर्घ काळापर्यंत प्रभावी असेल असे नाही. प्रभावी संभाषणाचा वास्तविक निकष हा लक्षपूर्वक ऐकणे आणि श्रोत्यांना संदेश देणे हा आहे. समंजस भाषेतील जटिल समस्यांचे स्पष्टीकरण देण्यासाठी प्रभावी संभाषक आपला आवाज, देहबोली आणि शैली नियंत्रित करू शकतात. सहकाऱ्यांना सांगण्यापूर्वी ते त्यांच्या कल्पनांवर आणि कार्यांवर विशेष प्रयत्न घेतात. त्यांचे संदेश स्पष्ट, वेळेवर आणि चांगल्या शब्दासह पोहोचवितात.
1930 मधील महात्मा गांधीच्या अहिंसा नागरी असहकार दांडी सत्याग्रहाद्वारे मीठांवरील अन्यायकारक कराच्या विरोधात ब्रिटिश सरकारला त्यांनी प्रभावीपणे संदेश दिला. निवडलेले प्रतीक 'मीठ', ही प्रत्येक घरातील दैनंदिन गरज, ज्याने सर्व भारतीयांना एकत्र केले. गांधीजी एक चांगले संवादक होते, त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत भारतीय समाजातील सर्व घटकांना प्रभावित केले.
2. समूह कार्य (टीमवर्क)
आपली बहुतेक ध्येये समूहकार्याशिवाय साध्य होऊ शकत नाहीत. एखाद्या समूहाचे सदस्य होण्यासाठी, एखाद्या व्यक्तीने आपल्या व्यक्तिगत महत्वाकांक्षेच्या पलीकडे जाणे आवश्यक असते. सर्वांनी स्वार्थी वृत्ती व ईर्ष्या बाजूला ठेवली पाहिजे. सामुदायिकपणे ठरविलेल्या सामान्य ध्येयास सर्वाचे प्राधान्य असावे. चांगल्या संघातील खेळाडू इतरांची काळजी घेतात आणि इतरांच्या गरजा जाणतात. एकदा निर्णय घेतल्यानंतर गंभीर मतभेद असली तरीदेखील ते आपली जबाबदारी मनापासून निभावतात.
याचे सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणजे 2011 चा क्रिकेट विश्वकरंडक विजेता भारतीय क्रिकेट संघ होय. त्या स्पर्धेतील अंतिम सामन्यातील सर्वोत्तम फलंदाज आणि मॅन ऑफ द सीरीज युवराज सिंग हा खेळत होता; सामन्यातील सर्वात महत्त्वाच्या टप्प्यात महेंद्रसिंग धोनी त्याच्यापुढे फलंदाजी करण्यास आला होता. असे का झाले? याचे उत्तर म्हणजे सचिन तेंडुलकरच्या सल्ल्याचा आदर करणे हा होता! "जर डावखुरा फलंदाज बाद झाला तर डावखुरा फलंदाज युवराज जाईल आणि उजव्या हाताचा फलंदाज गेला तर धोनी जाईल." सेहवागकडून धोनीला (कर्णधार) पाठविलेले हा सल्ला होता. हा वरिष्ठ खेळाडूंचा सल्ला ऐकण्यात आला आणि बाकी इतिहास आपणास ठाऊकच आहे. हे खरच खूप उत्तम समूहकार्याचे उदाहरण आहे.
3. विविधतेचे व्यवस्थापन
बहु-सांस्कृतिक कार्य वातावरणामध्ये आवश्यक असलेले हे अत्यंत महत्त्वाचे कौशल्य आहे. अभिवृत्ती, मूल्ये, विचारांची प्रक्रिया ह्या लिंग, शिक्षण, संस्कृती वगैरेमुळे प्रभावित होतात. अनेक ठिकाणी या विविधतेसह लोक वावरत असतात. या विविधतेला बलस्थानामध्ये रूपांतरित करण्यासाठी योग्य मानसिकतेची आवश्यकता लागते. त्यासाठी आपण सहिष्णु, जुळवून घेणारे आणि शांत स्वभावाचे असणे आवश्यक आहे. विशेषतः समस्यांच्या निराकरणासाठी नाविन्यपूर्ण आणि सर्जनशील उपाय मदतीचे ठरतात. समूहामधील विविधतेचे मूल्यमापन करून नवीन आव्हानांना प्रभावीपणे तोंड देता येते.
भारत हा जगातील सर्वात वेगळा आणि विविधतेने नटलेला देश आहे. सर्व प्रकारच्या विविधता उदा. धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, भौगोलिक इत्यादी भारतामध्ये स्पष्टपणे जाणवतात. खरोखर भारतीय बनण्यासाठी आपल्याला या विविधतेचा आदर करणे आणि सर्वांना जोडून घेणे शिकले पाहिजे. आपले संविधानिक मूल्य आपल्याला 'विविधतेमध्ये एकता' यासाठी मार्गदर्शन करते.
4. दबावामध्ये कार्य करण्याची क्षमता:
या स्पर्धात्मक जगात ‘ध्येय/लक्ष्य' हा शब्द सर्वत्र चर्चिला जातो. त्यामुळे लोकांना सतत विविध आव्हानांना सामोरे जावे लागते. ज्यायोगे दबाव निर्माण होते. जर आपण या धक्क्यांना सहन करू शकत नसाल तर ते शारीरिक किंवा मानसिक आजारांमध्ये रुपांतरीत होतात. यात शिस्त, प्रेरणा आणि वेळेचे व्यवस्थापन याविषयी चर्चा केली जाते. स्पष्टपणे विचार करणे आणि योग्य निर्णय घेणे आपल्याला सुसंघटन करण्यास मदत करतात. चुकांपासून तात्काळ शिकणे आणि शक्य तितक्या लवकर नकारात्मक भावना बाजूला ठेवणे या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करते. आपण गोष्टी यशस्वीरित्या प्राधान्यक्रमित केल्या आणि तणाव मर्यादित केला तर आपण तणावातही आनंदी राहू शकतो.
याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे लष्करातील जवान जे प्रचंड दबावाखाली काम करूनही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त असतात. त्यांच्यावर दबाव जसा वाढतो तशी त्यांची अनुकूलता वाढते हे पहाणे खूप उत्साहपूर्ण असते.
5. लवचिकता:
लोक जेव्हा त्यांच्या सवयी, कौशल्ये आणि मूल्ये बदलतात तेव्हा ते स्वाभाविकपणे/नैसर्गिकपणे असुरक्षित होतात. पण सध्याचे व्यवसाय/ करियर नाविन्यतेने आणि बदलांनी भरलेले आहे. जर आपण आपल्या 'कंम्फर्ट झोन' (सुरक्षित क्षेत्रामध्ये) मध्ये राहत असू तर आपण लवकरच कालबाह्य ठरू. जीवनात यशस्वी होण्यासाठी, आपल्याला नवीन ज्ञान शिकावे आणि आपली कौशल्ये अद्यावत करावी लागतील. आपल्याला नवीन आव्हानांना जुळवून घेण्यास लवचिकता मदत करते. लवचिकता आपली मनाची दारे उघडी करून नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा निर्माण करते.
शेतीतील जुन्या पारंपारिक पद्धतीने भारतीय शेतक-यांचे जीवन दुःखी झाले आहे. या समस्येचे निराकरण करण्यास सरकार मदत करू शकत नाही. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेतक-यांनी शेतीच्या नवनवीन पद्धती स्वीकारल्या पाहिजेत. हवामान अहवाल प्राप्त करण्यासाठी ई-चौपाल प्लॅटफॉर्मचा वापर करुन, शेतीविषयक नवनवीन पध्दती चांगल्या रीतीने जाणून घ्याव्यात, मागणीनुसार पुरवठा करा आणि शेती उत्पादनांची विक्री स्वत: करा. वरील चित्रातील शेतकरी या प्लॅटफॉर्मचा वापर करीत आहेत. कारण त्यांनी आपल्या पारंपारिक दृष्टिकोनामध्ये लवचिकता दर्शविलेली आढळते.
(सदर लेखातील चित्र, इमेज Google वरून साभार)
(सदर लेखातील चित्र, इमेज Google वरून साभार)
संदर्भ:
अभ्यंकर, ओक व गोळविलकर (2008). मानसशास्त्र- दक्षिण आशिया आवृत्ती. दिल्ली: पिअरसन लॉंगमन
अभ्यंकर, ओक व गोळविलकर (2008). मानसशास्त्र- दक्षिण आशिया आवृत्ती. दिल्ली: पिअरसन लॉंगमन
अभ्यंकर, ओक व गोळविलकर (2014). सामान्य मानसशास्त्र. दिल्ली: पिअरसन लॉंगमन
बडगुजर, बच्छाव व शिंदे (2009). सामान्य मानसशास्त्र. पुणे: डायमंड प्रकाशन
बर्वे बी. एन. (2006). व्यक्तिमत्व सिद्धांत. नागपूर: विद्या प्रकाशन
नाईक, शिरगावे, घास्ते व बिराजे (2013). सामान्य मानसशास्त्र. पुणे: निराली प्रकाशन
पलसाने, एम. एन. (2006). मानसशास्त्र. पुणे: कॉन्टिनेन्टल प्रकाशन
Ciccarelli, S.K. and White, J.N. (2012). Psychology- south Asia edition. New Delhi: Pearson Publication
ShivajiUniversity online SIM: Personality Development Skills, retrieved from
Congratulations Dr
उत्तर द्याहटवातुमचे काम चांगले आहे.हे सर्व पुस्तक रूपाने प्रसिध्द झाले पाहिजे
उत्तर द्याहटवालेखक मित्रा, तुझ्या लेखनप्रपंचास मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. पुस्तक प्रकाशित करण्यासाठी आवर्जून प्रयत्न करावे, सर्व प्रकारच्या वाचकांना हे वाचनास उपलब्ध व्हावे.
उत्तर द्याहटवाNYC aricle sir
उत्तर द्याहटवा