बोधनिक शैली: माहिती प्रक्रियेसाठी
या जगामध्ये प्रत्येक व्यक्ती इतराहून वेगळी आहे आणि त्याच्याकडे
ज्ञान मिळविण्याची एक अद्वितीय शैली असते. याव्यतिरिक्त प्रत्येक व्यक्तीकडे माहितीचे
संघटन आणि प्रक्रिया करण्याची तसेच ज्ञान व्यक्त करण्याची एक अद्भूत शैली असते.
शैली या संकल्पनेची सुरुवात सहजपणे कोठेही आढळून येत नाही. आजपर्यंत अनेक संदर्भग्रंथाचे
पुनरावलोकन केल्यानंतर शैलीबाबत ठोस माहिती समाविष्ट असलेली आढळते. शैली ही संकल्पना
पाच घटकाशी निगडीत आहे. अर्थात् बोधनिक, अध्ययन, अध्यापन, विचार आणि बौद्धिक शैली
यांचा समावेश होतो. सर्व प्रकारच्या या चाचण्या शैली व क्षमता यापासून भिन्न आहेत.
शैली ही बौद्धिक कार्यप्रणाली व व्यक्तिमत्त्व प्रकाराचे सामान्य गुणवैशिष्ट्य
आहे जे प्रत्यक्ष एखाद्या व्यक्तीशी वैयक्तिकरित्या संबंधित असते आणि ती त्यास
इतराहून वेगळे बनवते (ब्राउन, डी. एच., 2000).
शैली,
क्षमता आणि कार्यपद्धती यांच्यातील फरक:
शैलीबद्दलची माहिती वरील व्याख्यामध्ये स्पष्ट होते; परंतु 'शैली' आणि
'क्षमता' यांच्यातील फरक स्पष्ट करणे आवश्यक वाटते. कारण अनेक लोक शैलीलाच क्षमता
म्हणून संबोधतात. गिलफोर्ड (1980) यांनी स्पष्ट केल्याप्रमाणे त्याचे तीन
वैशिष्टये आहेत. 1) क्षमता ही कार्यक्षमतेच्या पातळीशी निगडीत असते, तर शैली ही कार्यक्षमतेच्या
पद्धतीवर लक्ष केंद्रित करते. 2) क्षमता एकांगी आहे, तर शैली सर्वांगीण आहे. 3)
क्षमता या मूल्यांनी युक्त असतात ज्यामध्ये एका बाजूला क्षमतेचे परिणाम
महत्त्वपूर्ण असतात आणि दुसऱ्या बाजूला नाही, तर शैलीचा परिणाम संपूर्णपणे
एकसारखाच मानला जातो.
राइडिंग (1992) यांच्या मते शैली आणि क्षमता या दोन्ही कार्यक्षमतेवर
परिणाम करू शकतात. त्यांच्यात मूलभूत फरक असा आहे की क्षमता जसजशी वाढते तसतसे कार्यप्रदर्शन
सुधारते आणि व्यक्तीच्या शैलीमुळे कार्यप्रदर्शनात एकतर सकारात्मक किंवा नकारात्मक
परिणाम दिसून येईल.
बऱ्याच वेळा, आपण सर्वजण रोजच्या जीवनात शैली हा शब्द आणि
कार्यपद्धतीची व्याख्या चुकीची पद्धतीने करतो. आपण नैसर्गिकरित्या मानवी गुणधर्म
प्रकट करतो, प्रत्येकजण समस्या सोडवतो / वास्तवाचा एक संच शिकतो / त्याच्या शैली
किंवा धोरणावरील एखाद्या अद्वितीय दृष्टीकोनातून भावनांचे संयोजन करतो.
कार्यपद्धती: एखाद्या समस्येकडे किंवा कृतीजवळ येण्याची विशिष्ट पद्धत आहे,
विशिष्ट निष्कर्ष मिळविण्यासाठीची कार्यपद्धती, माहिती नियंत्रित करण्यासाठी आणि
माहिती हाताळण्यासाठी नियोजित रचना म्हणजे रणनीती होय. रणनीती ही एका विशिष्ट
समस्येचे वर्णन करण्याचे अनेक संभाव्य मार्ग सुचवते आणि एखाद्या विशिष्ट
समस्येसाठी एक किंवा अनेक अनुक्रमांची शक्यता पुरविते.
या सदरात आपण बोधानिक शैलीविषयी जाणून घेणार आहोत. पद्धतशीर आणि अंतस्फूर्ती शैलींचे वर्णन मॅककेनी आणि किनी, (1974);
आणि बॉटकिन, (1974) यांच्या संशोधनावर आधारित आहे:
1.
पद्धतशीर बोधानिक शैली: पद्धतशीर बोधानिक शैली असल्याची ओळख असलेला विद्यार्थी म्हणजे
पद्धतशीर श्रेणीवर अधिक आणि अंतस्फूर्ती श्रेणीवर निम्न पातळी असते. हर्वार्ड
अभ्यासातील निष्कर्षांनुसार, एखादी व्यक्ती जी सामान्यत: सुव्यवस्थित माहिती गोळा
करते, ती समस्या सोडवताना एक सुधारीत, टप्याटप्याचे दृष्टीकोन अंगिकारते; एक
संपूर्ण पद्धत किंवा पूर्वनिर्धारित दृष्टिकोन शोधत असते; आणि नंतर समस्येचे
निराकरण करण्यासाठी एक समग्र योजना बनवते.
पद्धतशीर
बोधानिक शैलीची वैशिष्टे:
- एकांगी व मूर्त विचारसरणी,
- अत्यंत संरचित आणि तर्कसंगत अनुमान,
- सरळमार्गी व क्रमबद्द/नियमबद्ध दृष्टीकोन,
- तथ्ये, आकडेवारी आणि माहितीवर आधारित मूर्त विचार,
- कार्य करण्यायोग्य विभागांमध्ये समस्येचे विभाजन,
- एखाद्या समस्येचे लहान भागात विभाजित करून समस्या हाताळणी,
- निगामी अनुमान पद्धतीचा अवलंब,
- समस्या सोडवण्यासाठी एक सुस्पष्ट पद्धत किंवा योजना,
- अतिशय जागरूक दृष्टीकोन
- एखाद्या कामात खुप वेळ घेतात आणि एकावेळी एकच गोष्ट करतात,
- कामाचे छोटे छोटे भाग करणे,
- वर्गात जसे शिकवले आहे तसेच उद्दिष्ट केंद्रित सर्वोत्तम पर्यायाची निवड,
- जेथे स्पष्टीकरणाची आवश्यकता असते तेव्हा मदत मिळणे गरजेचे,
- बुद्धीप्रामाण्य आणि अमूर्त विचार प्रक्रियावर भर
2. अंतस्फूर्ती बोधानिक शैली: पद्धतशीर श्रेणीवर निम्न आणि अंतस्फूर्ती श्रेणीवर उच्च पातळी
निर्धारित करतो असे विद्यार्थी अंतर्ज्ञानी शैली असल्याचे वर्णन होते. एखाद्याची शैली अंतस्फूर्ती प्रकारची असेल तर समस्या सोडविताना विश्लेषणात्मक पायरीवर अनपेक्षित क्रमवारी
वापरली जाते. असंतुलित चिन्हे किंवा स्थिरता नसणाऱ्या वर्णनाद्वारे अनुभवलेल्या
नमुन्यांवर अवलंबून असतात, नवीन पर्यायांचा शोध घेतात आणि असे पर्याय शिघ्रपणे सोडूनही
देतात.
अंतस्फूर्ती बोधानिक शैलीची वैशिष्टे:
- अमूर्त पातळीवर विचार,
- विविधांगी विचार प्रक्रिया,
- कल्पना आणि भावनांवर आधारीत वैश्विक दृष्टीकोन,
- उत्स्फुर्तपणे प्रक्रिया केंद्रित विगामी अनुमान,
- दृष्टीकोन जाणीवपूर्वक जागरूक नाही,
- सामान्यतः अनुभवाद्वारे चालविली जाणारी एक पद्धत वापरतात,
- संपूर्ण समस्या सतत लक्षात ठेवतात,
- वारंवार समस्या पुन्हा परिभाषित करतात,
- समस्येचे मोठे चित्रण किंवा समस्येची संपूर्णता व्याप्ती माहित असते,
- गतिशील, अरेखीय, एकावेळी अनेक गोष्टी करतात,
- नमुना जुळणी व स्वैरपणे विचारावर आधारित व्यवहार्य पर्यायाची निवड,
- गरज असेल तेंव्हा क्रिया आवश्यक
3.
एकात्मिक बोधानिक शैली: एकात्मिक शैली असलेली व्यक्ती दोन्ही प्रकारात उच्च प्रगती दर्शविते
आणि दोन्ही शैलीमध्ये जलद गतीने स्वतःला सहज बदलू शकते. अशा शैलीतील बदल हे अचूक असून
ते काही सेकंदात घडतात. या "वेगवान गती" क्षमतेचा परिणाम असा आहे की
समस्या सोडवण्यासाठी ऊर्जा आणि सक्रिय दृष्टिकोन निर्माण होतो असे दिसते.
प्रत्यक्षात, एकात्मिक विद्यार्थी बऱ्याचदा "समस्या शोधक" म्हणून ओळखले
जातात कारण ते संभाव्य समस्या परिहारामध्ये उत्कृष्ट मार्ग शोधण्यासाठी सतत संधी
शोधण्याचा प्रयत्न करतात.
एकात्मिक
बोधानिक शैलीची वैशिष्टे:
- मानसिक व भावनिक संतुलित विकास,
- दुहेरी बोधात्मक प्रक्रिया सुरु असते,
- विविध क्षेत्रातील विशेष माहिती असते,
- अतिशय लवचिक आणि अनुकूल असतात,
- सहज आणि त्वरीत एका शैलीतून दुसऱ्या शैलीत रुपांतर,
- आंतरिक नियंत्रण केंद्र उच्च दिसून येतो,
- समस्या सोडविण्यासाठी संधी शोधत असतात,
- नाविन्यपूर्ण/ सर्जनशील व नेहमी सक्रीय असतात.
प्रत्यक्ष वर्गाचा विचार केल्यास आपणास असे अनेक विद्यार्थी आढळून
येतील जे वेगळ्याच तालात, विचारात गुंतलेले असतात. अशा विशिष्ठ बोधानिक शैली
असलेल्या विद्यार्थ्याची गुणवैशिष्टे खालीलप्रमाणे:
पद्धतशीर
बोधानिक शैली :
- नवी पध्दती शोधून काढून व नव्या नियोजनाच्या सहाय्याने समस्या सोडवितात.
- स्वतःच्या मताविषयी खूपच जागरूक असतात.
- अशा व्यक्तीनी मांडलेले विचार हे पद्धती म्हणून स्वीकारली जाते.
- अशा व्यक्तींना आपल्या मर्यादा माहित असतात.
- नको असलेल्या पर्यायाचा तात्काळ त्याग करतात.
- प्रत्येक गोष्टीचे मार्मिकपणे विश्लेषण केले जाते.
- टप्या-टप्याने प्रक्रीया पूर्ण केली जाते.
- पूर्व निर्धारित नियोजनानुसार प्रत्येक गोष्टीची पूर्तता केली जाते.
पद्धतशीर (तर्कसंगत) शैली असलेले लोक
नियमांच्या आधारे विचार करतात. मूलभूत नियम शोधण्यासाठी वेगवेगळ्या पर्यायांचे
तार्किकपणे मूल्यांकन करून ते परिस्थितीचे विश्लेषण करतात. हे नियम त्यांना विविध
परीस्थितीत पद्धतशीर जगण्यास मदत करतात व एखादे कार्य कसे करावे यावर अवलंबून असू
शकतात. उदाहरणार्थ, एक अकाउंटंट/लेखापाल पद्धतशीर बोधानिक शैलीचा असू शकतो. कामावर आणि
इतर संदर्भांमध्ये, लेखाकार संघटित आणि कार्यक्षम असण्याची शक्यता असते आणि परिस्थितींचे
वर्गीकरण आणि विश्लेषण करणे, नियम आणि नियमितता शोधणे आणि लागू करणे अशी शक्यता असते.
अंतस्फूर्ती
बोधानिक शैली:
- असे विद्यार्थी प्रत्येक गोष्टीचा सातत्याने विचार करीत असतात.
- असे विद्यार्थी गरजेनुसार समस्येची पुर्नमांडणी करतात.
- असे विद्यार्थी नेहमी अशाब्दिक संकेतावर विश्वास ठेवतात.
- असे विद्यार्थी जोपर्यंत मनासारखे घडत नाही तोपर्यंत प्रयत्न करत राहतात.
- असे विद्यार्थी एकावेळी अनेक पर्यायांचा विचार करतात.
- असे विद्यार्थी सुनिश्चित टप्याचा विचार न करता स्वैरपणे विचार करतात.
- असे विद्यार्थी एखादा पर्याय तात्काळ शोधतात व तेवढ्याच शिघ्रपणे सोडूनही देतात.
आपल्या जीवनातील ९० टक्के निर्णय हे अंतस्फूर्तीद्वारे घडून येतात.
असे गॅरी क्लेन (2004) यांनी त्यांच्या The power of Intuition या पुस्तकात
अधोरेखित केलेले आहे. पण रॉबिन्सन (2005) यांच्या संशोधनातून असे आढळून आलेले आहे
की एकूण नमुन्याच्या केवळ 5 टक्के लोक अंतस्फूर्ती बोधानिक शैलीचे असतात.
अंतस्फूर्ती बोधानिक शैलीचे लोक हे तथ्ये आणि प्रदत्ताच्या आधारे बुद्धिनिष्ठ
प्रक्रियेचा विचार न करता अनेक वर्षाच्या अनुभवातून त्यांची विचार प्रक्रीया सुरु
असते. पूर्वनिर्धारित किंवा गृहीतकाचा आधार न घेता ते प्रत्येक गोष्टीचे आकलन करत
असतात.
सॅडलर – स्मिथ (2005) यांच्या मते अंतस्फूर्ती बोधानिक शैलीचे लोक हे
शीघ्र गतीने, जाणीवेच्या पलीकडे जाऊन, समग्र संबधाचा प्रभावीपणे अंदाज बांधतात.
वास्तव परिस्थितीच्या पलीकडे जाऊन कार्य करण्याची वृत्ती असते. प्राप्त परीस्थितीत
माहितीचे विश्लेषण पटकन करतात व मिळालेली माहिती आहे तशीच न मांडता स्वतःची अशी एक
वेगळी छाप त्यासोबत सोडतात. बऱ्याचदा त्यांनी मांडलेले विचार अतार्किक व सत्याला
सोडून असतात. कारण हे लोक नेहमी सर्व सामान्यापेक्ष्या वेगळा विचार करतात. पण
अंतस्फूर्ती बोधानिक शैलीचे लोक हे आपले विचार अनेक वर्षाच्या अनुभवातून आलेल्या
निश्चित तथ्याच्या आधारे मांडत असतात. ईपस्टेन (1996) यांच्या मते अंतस्फूर्ती
बोधानिक शैली ही प्राप्त माहितीपेक्षा व्यक्तीच्या सजग (mindfulness) अनुभवावरच
अधिक अवलंबून असते.
अंतर्ज्ञानी बोधानिक शैली असलेल्या व्यक्ती साहचर्य पद्धतीने विचार करतात, याला अनुभवात्मक
विचार देखील म्हटले जाते. त्यांच्याकडे समग्र आणि वैश्विक दृष्टीकोन असतो आणि
त्यांना त्यांची विचार करण्याची पध्दती माहित नसते. ते अनुभव साहचर्य एकाग्र करतात
आणि अंतर्ज्ञानांवर अवलंबून असतात, केवळ तथ्येच नव्हे तर भावना आणि संदर्भ देखील लक्षात घेतात.
उदाहरणार्थ, एखाद्या कलाकारास अंतर्ज्ञानी शैली असणे आवश्यक आहे. कामावर आणि इतर
संदर्भांमध्ये, कलाकार एकत्रितपणे माहितीच्या तुकड्यांना जोडणाऱ्या जटिल, समग्र पद्धतीने
परिस्थितींचे विश्लेषण करण्याची शक्यता असते.
एकात्मिक
बोधानिक शैली:
- अशा विद्यार्थ्याचे मानसिक व भावनिक संतुलित असते,
- अशा विद्यार्थ्याची संज्ञानात्मक प्रक्रिया व्दिमार्गी सुरु असते,
- अशा विद्यार्थ्याना विविध क्षेत्रातील विशेष माहिती असते,
- असे विद्यार्थी अतिशय लवचिक आणि अनुकूल असतात,
- असे विद्यार्थी सहज आणि त्वरीत एका शैलीतून दुसऱ्या शैलीत रुपांतरीत होतात,
- अशा विद्यार्थ्याचे आंतरिक नियंत्रण केंद्र उच्च दिसून येते,
- असे विद्यार्थी समस्या सोडविण्यासाठी संधी शोधत असतात,
- असे विद्यार्थी नाविन्यपूर्ण/ सर्जनशील व नेहमी सक्रीय असतात.
विद्यार्थी जीवनात बरेचसे विद्यार्थी हे एकात्मिक बोधानिक शैलीचे
आढळून येतात. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना विविध प्रसंगांना अनुसरून कार्य करायचे
असते. तसेच अनेक विद्यार्थी हे आपल्या अनुकुलतेनुसार कार्य करणे पसंद करतात.
त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना पद्धतशीर आणि अंतर्ज्ञानी बोधानिक शैली अंगी बाळगणे
अत्यावश्यक असते. परिस्थितीचा अंदाज घेऊन कार्य केल्याने कमीतकमी श्रमात अधिक
कार्य घडून येते अशा विद्यार्थ्यांना आपण स्मार्ट म्हणतो. जीवन समृध्द करण्यासाठी
कोणत्याही टोकाचा विचार न करता परिस्थितीनुसार आपले आचरण असणे आवश्यक असते.
(सदर लेखातील चित्र, इमेज Google वरून साभार)
संदर्भ:
Brown,
D. H. (2000). Principles of language learning & teaching. (4th ed.). New
York: Longman. (pp. 49-58)
Cassidy,
S. (2004). Learning
styles: An overview of theories, models, and measures, Educational
Psychology,24(4), 419-444
Fleming, N. D. and Mills,
Colleen (1992). Not Another Inventory, Rather a Catalyst for Reflection, To
Improve the Academy, Vol. 11, pp. 137
King,
A., (2011). Culture, Learning and Development: A Case Study on the Ethiopian
Higher Education System.
Lewis,
M. A., 2014. Learning Styles, Motivations, and Resource Needs of
Students, s.l.: Chapel Hill, North Carolina.
Markus,
H.R. & Kitayama, S., H. R. & Kitayama, S., (1991). Culture and the self:
implications for cognition, emotion and motivation. Psychological Review,
Volume 2, p. 98.
Rayner, S., & Riding, R. J. (1996).
Cognitive style and school refusal. Educational Psychology, 16, 445–451.
Rayner, S., & Riding, R. J. (1997).
Towards a categorisation of cognitive styles and learning styles. Educational
Psychology, 17, 5–28.
Sadler-Smith, E. (2009). A duplex model of cognitive style. In L. F. Zhang
& R. J. Sternberg (Eds.), Perspectives on the nature of intellectual styles
(pp. 3–28). New York, NY: Springer Publishing Company.
Sternberg, R. J., & Grigorenko, E.L. (1997). Are cognitive
styles still in style?. Ameerican
Psychooloogist, 52, 700-712
Sternberg, R. J., & Zhang, Li-Fang (2001). Perspectives on
thinking, learning, and cognitive styles. Mahwah, NJ: Lawrence Erlbaum
associates.
Tourangeau,
R. and
Sternberg, R. J. (1981). Aptness in metaphor. Cognitive Psychology 13, 27-55.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thank you for your comments and suggestions