आंतरक्रियात्मक विश्लेषण (Transnational Analysis)
मानवी जीवन हे अनेक संबंधानी व्यापलेले
आहे आणि जर संबंध असेल तर सुख-दु:ख आलेच. जेव्हा दोन लोक एकत्र येतात तेव्हा त्या
दोघांमध्ये काही परस्परसंबंध बनतात. हे परस्परसंबंधाचे नाते काहीही असू शकते जसे वडील-मुलगा, पती-पत्नी, प्रियकर-प्रेयशी, भाऊ-भाऊ, भाऊ-बहीण, मित्र-मित्र, अधिकारी-कर्मचारी, मालक-नोकर, दुकानदार- ग्राहकाचे नाते. या
संबंधांमुळे, आपल्या जीवनात पुढीलपैकी एक किंवा चार
प्रकारची परिस्थिती निर्माण होऊ शकतात:
मी ठीक आहे, तूही ठीक आहेस,
मी ठीक आहे, पण तु ठीक नाहीस,
मी ठीक नाही, पण तु ठीक आहेस आणि शेवटी
मी ठीक नाही, आणि तुही ठीक नाहीस.
अनेकांनी
Thomas Harris
यांचे I'm
OK, You're OK हे पुस्तक वाचले असेल तर लगेच लक्षात येईल की हे आंतरक्रियात्मक विश्लेषनाचे वर्गीकरण आहे.
आंतरक्रियात्मक विश्लेषण हे आधुनिक
मानसशास्त्रातील अग्रगण्य मनोचिकित्सक एरिक बर्न यांनी विकसित केले एक तंत्र आहे.
यामध्ये एखाद्या व्यक्तीच्या परस्परसंबंध आणि आंतरक्रियांचे परीक्षण केले जाते. एरिक बर्न यांनी
सिग्मंड फ्रायडच्या व्यक्तिमत्त्व सिद्धांतांमधून प्रेरणा घेऊन आंतरक्रियात्मक विश्लेषण तंत्र विकसित केलेले आहे. प्रत्येक
व्यक्ती मूल्यवान असून ती सकारात्मक बदल आणि वैयक्तिक विकासाची क्षमता असणारी आहे,
ही कल्पना रुजविणे आणि ती दृढ करण्याच्या उद्देशाने एखाद्यामध्ये परस्परसंवाद आणि सुसंवाद
प्रस्थापित करण्यासाठी आंतरक्रियात्मक विश्लेषणाचा वापर केला जाऊ शकतो.
आंतरक्रियात्मक विश्लेषणाचा विकास:
डॉ. एरिक बर्न यांनी 1950 च्या शेवटच्या दशकात सामाजिक परस्पर
संबंधाच्या मूलभूत घटकाचे वर्णन करण्यासाठी "आंतरक्रिया" हा घटक वापरुन आंतरक्रियात्मक विश्लेषण तंत्र विकसित केले. " आंतरक्रियात्मक विश्लेषण" यामध्ये व्यक्ती-व्यक्तीमधील सामाजिक परस्परसंवादाचे अभ्यास
समाविष्ठ आहे. रेने स्पिट्झ, एरिक
एरिक्सन, पॉल फेडरन, एडोआर्डो वेस, फ्रॉइड आणि तसेच कॅनडाचे
न्यूरो सर्जन वाइल्डर पेनफिल्ड सारख्या समकालीन लोकांच्या कामाचा प्रभाव त्याचावर
पडला होता.
फ्रायडच्या व्यक्तिमत्त्व सिद्धांतामुळे प्रेरित झाला होता. त्यास
मानवी वर्तन हे मुख्यतः बहुआयामी असते आणि विभिन्न घटक विविध प्रकारच्या भावना, वृत्ती आणि जटिल वर्तन निर्माण
करण्यासाठी संवाद साधतात हे पटले होते. पेनफिल्डच्या विद्युतीय प्रवाहांमुळे
विशिष्ट मेंदूच्या क्षेत्रास उत्तेजना दिल्यास पुर्वांनुभव जागृत होतात यावरील प्रयोगामुळे
प्रभावित झाला होता. एरिक बर्न हा नव आणि विभक्त-फ्रायडियन म्हणून विकसित झाला आणि त्याने
एक नवा दृष्टिकोन विकसित केला.
फ्रायडने अनुभवजन्य माहितीद्वारे सादर केलेल्या तात्विक संकल्पनांवर
विचार करण्याची गरज लक्षात घेऊन, फ्रॉइडच्या इदम (भावनिक आणि अतार्किक घटक) अहंम (तर्कसंगत घटक) आणि पराहम
(नैतिक घटक) असे व्यक्तिमत्त्वाचे भिन्न आणि निरीक्षण न होऊ शकणाऱ्या घटकाऐवजी
बर्नने पालक, प्रौढ
आणि बालक यासारखे अहंमविषयीच्या घटकाची मांडणी केली.
बर्न यांनी मानवी परस्परसंवादातील जटिलतेची विशेष दखल घेतलेली आहे. कोणत्याही
शब्दापेक्षा भावनिक अभिव्यक्ती, हावभाव, देहबोली आणि आवाजातील चढउतार हे अधिक महत्त्वाचे मानले जातात या
वस्तुस्थितीवर त्यांनी प्रकाश टाकला. त्यांच्या ‘गेम्स पीपल प्ले’ या पुस्तकात
त्यांनी नमूद केले आहे की लोक कधीकधी गुप्त हेतू असलेल्या संदेशांवरदेखील संवाद
साधू शकतात.
आंतरक्रियात्मक विश्लेषणात अहंमच्या अवस्थाचे परीक्षण:
बर्नने फ्रायडप्रमाणे असे नमूद केले की, प्रत्येक व्यक्तीमध्ये अहंमच्या
तीन अवस्था असतात. बर्नने मांडलेल्या अहंमच्या अवस्था पालक, प्रौढ आणि बालक हे फ्रॉडच्या इदम, अहंम आणि पराहमशी प्रत्यक्ष संबंधीत
नाहीत. त्याऐवजी या अवस्था वैयक्तिकरित्या पालक, प्रौढ आणि बालकांच्या अंतरिक
प्रतिमानाच्या स्वरुपात दर्शवितात. एखादी व्यक्ती यापैकी कोणतीही भूमिका दुसर्या
व्यक्तीशी किंवा स्वतःशी संभाषण साधता असताना गृहित धरू शकतात. या भूमिका
त्यांच्या ठराविक इंग्रजी परिभाषांशी थेट संबंधित नाहीत परंतु त्यांचे वर्णन
खालीलप्रमाणे केले जाऊ शकते:
पालक:
मुलाच्या
जन्मापासून ते आयुष्यातील पहिल्या पाच वर्षांच्या काळात पाहिलेल्या आणि अनुभवलेल्या
बाह्य घटनांचा समावेश पालक यामध्ये होतो. या नोंदी मुलाकडून शुद्ध केलेले किंवा
त्यांचे विश्लेषण केलेले नसते; ते फक्त प्रश्न न करता स्वीकारले जातात. यापैकी बर्याच बाह्य
घटनांमध्ये बालकाचे प्रत्यक्ष पालक किंवा पालकांच्या भूमिकांमध्ये असणाऱ्या इतर
प्रौढांचा सहभाग असू शकतो, ज्यामुळे बर्नने या अहंमच्या अवस्थास “पालक” म्हटले आहे. या अवस्थामध्ये नोंद
केलेल्या बाह्य घटनांची उदाहरणे:
-
खेळ खेळू नका.
- "कृपया"
आणि "धन्यवाद" म्हणायला विसरू नका.
- अनोळख्या
व्यक्तीशी बोलू नका.
बालक: मुलाच्या अंतर्गत घटने (भावस्थिती
किंवा भावना) च्या मेंदूतील सर्व नोंदींचे प्रतिनिधित्व करते जे आयुष्याच्या
पहिल्या पाच वर्षांत मुलाने पाहिलेल्या बाह्य घटनांशी प्रत्यक्ष जोडलेले असते. या घटकामध्ये
नोंदवलेल्या घटनांच्या उदाहरणांमध्ये खालील बाबी समाविष्ट असू शकतात:
- आईने
मला मिठी मारल्यावर मला आनंद होतो.
-
मोठ्यांचे उशिरा रात्रीचे चित्रपट खूपच भयानक असतात.
- आई
दु:खी असताना मला वाईट वाटते.
प्रौढ:
अंतिम अहंमची अवस्था
म्हणजे प्रौढ, पालक
म्हणून निरीक्षण केलेली किंवा बालक म्हणून अनुभवलेली परिस्थिती ही भिन्न असते हे समजून
घेण्याची क्षमता या काळात विकसित केली जाते. प्रौढ माहितीवर प्रक्रिया करण्याचे
केंद्र म्हणून काम करते जे निर्णय घेण्याकरिता तिन्ही अहंमच्या अवस्थाधील माहितीचा
वापर करते. प्रौढ व्यक्तीची एक महत्वाची भूमिका म्हणजे पालकांमध्ये साठवलेली
माहिती प्रमाणीत करणे:
- मी
पाहतो की शेतातील घर जळून गेले आहे.
- आई
बरोबर होती — मी खेळ
खेळू नये.
आंतरक्रियात्मक विश्लेषण तंत्राचा वापर:
दुसऱ्या व्यक्तीच्या उपस्थितीची जाणीव करून देणाऱ्या कोणत्याही संकेतास
(भाषा, हावभाव किंवा इतर अशाब्दिक संकेत)
आंतरक्रियात्मक उद्दीपक म्हणतात. सर्व आंतरक्रिया या आंतरक्रियात्मक उद्दीपकास
प्रतिसाद म्हणून सुरू केले जातात. जेव्हा कोणत्याही दोन अवस्था एकमेकांना सामोरे
जातात तेंव्हा त्यातील माहिती स्वीकारणारा हा आंतरक्रियात्मक उद्दीपक असतो तर
दुसरा हा प्रतिसादक म्हणून कार्यरत असतो. व्यक्ती-व्यक्तीमधील यशस्वी संप्रेषणाची
गुरुकिल्ली सामान्यत: कोणत्या अहंमने (माहिती देणारा) आंतरक्रियात्मक उद्दीपक
म्हणून सुरुवात केली आणि कोणत्या अहंमने (माहिती स्वीकारणारा) आंतरक्रियात्मक
प्रतिसाद दिला हे ओळखण्यात आहे.
प्रौढ व्यक्तीच्या सामान्यत: तर्कसंगत आणि समंजस स्वभावामुळे, बर्नचा असा विश्वास आहे की प्रौढ अहंम
असलेल्या अवस्थामध्ये सर्वात सोपी आणि सरळ आंतरक्रिया घडून येते, पण तिन्हीपैकी कोणत्याही अहंम अवस्थात आंतरक्रिया
घडून येऊ शकतात. पूरक आंतरक्रियामध्ये माहितीचे
देवाणघेवाण परस्परपूरक म्हणजे प्रौढाकडून बलाकाकडे आणि बालकाकडून प्रौढाकडे होत
असेल तर, बर्न यांच्या मते आंतरक्रिया
एकमेकास पूरक असतील तर संप्रेषण सुरू राहील.
संप्रेषण हा केवळ दैनंदिन जीवनाचा एक महत्वाचा पैलू मानला जात नाही
तर हा माणूस जिवंत असण्याचा अविभाज्य भाग मानला जातो. नवजात मुलास देखील ओळखणे आणि
प्रतिसाद देणे या क्रिया आवश्यक असतात. स्पिट्झ यांनी केलेल्या संशोधनात असे दिसून
आले आहे की ज्या शिशुंना कुशीत घेणे, हाताळणे
आणि स्पर्श या बाबी कमी घडल्या आहेत त्यांना शारीरिक आणि भावनिक आव्हानांचा सामना
करावा लागण्याची अधिक शक्यता असते. बर्नने अंगभूत गरज म्हणून सामाजिक मान्यता ओळखल्या
जाणार्या या सामाजिक गरजेचे वर्णन केलेले आहे.
आंतरक्रियात्मक विश्लेषण एक मानसोपचार
पद्धती:
मानसोपचार पद्धतीमध्ये आंतरक्रियात्मक विश्लेषणाचे
मुख्य उद्दीष्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीस प्रौढ अवस्था बळकट करून देणे आणि
स्वायत्तता राखण्यास मदत करणे. थोडक्यात, एक
व्यक्ती आणि मानसोपचारतज्ञ यांच्यात एक करार होईल जे त्यांना थेरपीमध्ये प्राप्त
करू इच्छित असणाऱ्या परिणामाची रूपरेषा देतील. यामुळे उपचारादरम्यान घडणाऱ्या घटनांसाठी
वैयक्तिक जबाबदारी घेतलेल्या व्यक्तीस थेरपीमध्ये योगदान देता येईल. यामुळे सामान्यत:
प्रौढ व्यक्तीच्या अहंमच्या अवस्थामध्ये अडथळा आणणारे विविध विचार, आचरण आणि भावना यांना थोपाण्यास मदत
होईल.
आंतरक्रियात्मक विश्लेषणामध्ये दिलासादायक, सुरक्षित आणि आदरयुक्त पूरक वातारण असते.
जेव्हा थेरपिस्ट आणि उपचार घेणाऱ्या व्यक्तीमध्ये सकारात्मक संबंध तयार होतो
तेव्हा बहुतेक वेळा थेरपीच्या क्षेत्राच्या बाहेर विकसित संबंधांचे हे एक आदर्श प्रतिमानच सादर करते. विश्लेषक या प्रकारच्या थेरपीचा सराव करताना सामान्यतः मनोगतिक, बोधात्मक वर्तन आणि संबधित थेरपीमध्ये
अनेक विषयांमधून एकत्रित केलेली विस्तृत साधने वापरतात.
आंतरक्रियात्मक विश्लेषण कोणास उपयुक्त
आहे?
वैद्यकशास्त्र, संप्रेषण, शिक्षण आणि व्यवसाय व्यवस्थापन तसेच
थेरपी या क्षेत्रात आंतरक्रियात्मक विश्लेषण अधिक प्रमाणात वापरले जात आहे. या तंत्राचा
उपयोग मुख्यत्वे पालक, व्यावसायिक, सामाजिक कार्यकर्ते आणि जास्तीत जास्त
वैयक्तिक विकास साधण्याचा प्रयत्न करणारे करत आहेत. आंतरक्रियात्मक विश्लेषण ही
स्वतःशी आणि इतरांशी परस्परसंबंध विकसित करण्याची एक प्रभावी पद्धत मानली जाते.
समुपदेशक आणि चिकित्सकांकडून सध्या
उपचार घेत असलेल्या व्यक्तीला भेडसावणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी वापरले जाणारे आणि
तीव्र आरोग्यविषयक आव्हानांमुळे उद्भवू शकणार्या भावनिक आणि नातेसंबंधातील
अडचणींच्या उपचारात एक प्रभावी साधन असू शकते असे अनेक संशोधनातून दिसून आलेले
आहे.
आंतरक्रियात्मक विश्लेषणाचा उपयोग
शैक्षणिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात केला जाऊ शकतो. शैक्षणिक तत्त्वे आणि
तत्वज्ञान विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनात समाविष्ट करण्यासाठी ही पद्धत एक वाहक
म्हणून काम करते. या प्रकारची थेरपी कोणत्याही सामाजिक परिस्थितीत आणि सर्व वयोगटातील मुले आणि प्रौढांसाठी दिली जाऊ शकते.
एक प्रमाणित आंतरक्रियात्मक विश्लेषक
कसे बनता येईल?
प्रमाणित आंतरक्रियात्मक विश्लेषक (CTA)
म्हणून पात्र होण्यासाठी,
आपणास प्रथम आंतरक्रियात्मक विश्लेषण
कोर्स पूर्ण करावा लागेल त्यासाठी पुढील वेबसाईटवर अधिक माहिती मिळेल https://www.itaaworld.org/qualifying-ta
प्रमाणपत्राच्या पुरेशा तयारीसाठी आंतरक्रियात्मक
विश्लेषण क्षेत्रात पात्र ठरलेल्या संस्थेशी करार करावा लागतो. आंतरराष्ट्रीय
प्रमाणपत्र परिषद ही या करारासाठी त्रयस्थ संस्था म्हणून कार्य करते. यासाठी लेखी
परीक्षा आणि तोंडी परीक्षा उत्तीर्ण व्हावे लागते. त्याचबरोबर काही विशिष्ठ
कालावधीसाठी उमेदवारी योजनेमध्ये सहभागी व्हावे लागते. त्यानंतर आपणास स्वतंत्र आंतरक्रियात्मक
विश्लेषक म्हणून काम करत येते.
(सदर लेखातील चित्र, इमेज Google वरून साभार)
अधिक वाचनासाठी पुस्तके
Bennett, R. (1999). A transactional
analysis approach to the categorization of corporate marketing behavior. Journal
of Marketing Management, 15, 265-289.
Eric
Berne (1961). Transactional Analysis in
Psychotherapy: A Systematic Individual and Social Psychiatry,
UK: Souvenir Press
Eric
Berne (1977). Intuition and Ego
States: The Origins of Transactional Analysis: a Series of Papers, UK: TA Press
Harris, T. (2004). I'm
OK, You're OK. New York: Harper
Publication
Harris, T. (2004). I'm
Ok, You're Ok: A practical guide to Transactional Analysis, New York: Arrow
publication (Harper)
McLeod, J. (2013). Process and
outcome in pluralistic transactional analysis counselling for long-term health
conditions: A case series. Counseling and Psychotherapy Research,
13(1), 32-43.
Milner, B. (1977). Wilder
Penfield: his legacy to neurology. Memory mechanisms. Can Med Assoc Journal.
116(12):1374-1376
Penfield,
W. and Mathieson, G. (1974). Memory: Autopsy findings and comments on the role
of hippocampus in experiential recall. Arch
Neurol. 31(3):145-154.
ताडफले,
ए. (२०१७). आय एम ओके यू आर ओके, ठाणे:
मेजेस्टीक प्रकाशन
वाडकर, अलका (२०१८). यशस्वी जीवनासाठीची कौशल्ये, नवी दिल्ली: सेज प्रकाशन
Nyc👌👌
उत्तर द्याहटवाVery nyc sir
उत्तर द्याहटवाNice
उत्तर द्याहटवासुंदर मांडणी.👍
उत्तर द्याहटवा