क्रिएटिव्ह कॉमन्स परवाने (Creative Commons Licenses)
Covid-19 महामारीच्या काळात
अनेक लेखक आणि कवी पाहायला मिळत आहेत. पण खरे पाहता चारोळी, दोनोळी वगळता, प्रत्येकाला
आपल्या लिखाणाबद्दल आत्मीयता असतेच. त्यासाठी त्यानी खुप कष्ट घेतलेले असतात. अशा लेखनात
स्वत:चे अनुभव सामावलेले असतात आणि जीवनाविषयीच्या भावना गुंतलेल्या असतात. असे लेखन
साहित्य जर कोणी बिनदिक्कत चोरी करुन आपल्या स्वत:च्या नावावर खपवत असेल तर कोणत्याही
लेखकास आवडणार नाही.
आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात लेखनाची चोरी करणं सोपं झालेलं
आहे. कॉपी पेस्ट नावाचे शब्द ज्या कारणासाठी उदयास आले त्याचा अर्थच बदलून गेला आहे.
आज शैक्षणिक क्षेत्रात सर्वात बदनाम झालेले हे दोन शब्द. अनेक विद्यार्थी आणि काही
शिक्षकही कॉपीराइट, मुक्त शैक्षणिक संसाधन परवाने
आणि मुक्त परवाने याबद्दल अनभिज्ञ असलेले दिसून येतात. संगणक साक्षरतेबरोबर आज इंटरनेट
साक्षरताही तितकीच महत्त्वाची बनली आहे.
आपल्याला हे माहिती आहेच की जेव्हा
आपण आपल्या विषयातील एखादा घटक तयार करुन तो इंटरनेटवर अपलोड करतो तेव्हा आपण
आपोआप त्या घटकाचे कॉपीराइट मालक बनतो. आपण संमती देत नाही तोपर्यंत इतर लोक
आपल्या घटकातील आशय वापरू शकत नाहीत. किंवा त्याचा पुनर्वापर, पुनर्मांडणी किंवा ते सामायिक करू शकत नाहीत. तसे, आपले
लिखाण मुक्त शैक्षणिक स्त्रोत नाही. परंतु नि:शुल्क शैक्षणिक संसाधने नियमाने विनामूल्य
आहेत आणि मुक्त शैक्षणिक संसाधने वापरण्याचा अधिकार मुक्त परवाना अंतर्गत मांडता
येतो. कोणतीही व्यक्ती या मुक्त शैक्षणिक संसाधनाची उपयोगिता, सामायिकरण आणि इतर शैक्षणिक संसाधनांसाठी काही निर्बंध घालून घेऊन वापर करू
शकते असे हे अधिकार सूचित करतात. उदाहरणार्थ
- आपल्या विषयातील एखादा विडियो मुक्त शैक्षणिक संसाधन असू शकतो आणि त्यास मुक्त परवाना
अंतर्गत इंटरनेटवर पोस्ट करु शकतो. त्याचप्रमाणे, आपण जे
काही शैक्षणिक साहित्य तयार करू जसे ऑडिओ, व्हिडिओ, आकृती, सादरीकरण, चित्र आणि
पीडीएफ इत्यादी मजकूरास आपण मुक्त परवाना जोडून त्यास मुक्त शैक्षणिक संसाधने बनवू
शकतो. इंटरनेटवर बरीच मुक्त शैक्षणिक संसाधने उपलब्ध असल्याने, अशी मुक्त शैक्षणिक स्त्रोत ओळखण्याची पद्धत समजून घेण्याची आवश्यकता आहे.
आपण अशा काही परवाना संबंधी चर्चा करूया जे काही निर्बंध घालून कोणालाही पुन्हा
वितरित करता येतात.
अशा प्रकारे, मुक्त शैक्षणिक स्त्रोतांसोबत नेहमीच काही विशिष्ट प्रकारचे परवाने
जोडलेले असतात ज्यांना सामान्यत: मुक्त परवाने म्हटले जाते. ही परवाने नेमकी कोणती
आहेत? तर जगभर सर्वसामान्यपणे वापरली जाणारी आणि सर्वाधिक
लोकप्रिय परवाने म्हणजे क्रिएटिव्ह कॉमन्स (CC) परवाने होत.
ते आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त, प्रमाणित आणि
प्रस्थापितही आहेत. क्रिएटिव्ह कॉमन्स परवाना आपले साहित्य वापरण्यास, संपादित करण्यास आणि मिश्रण करण्यास कायदेशीर परवानगी बहाल करतात (आपण
गायकांच्या रीमिक्स गाणी याबाबत परिचित आहोत). रिमिक्सिंगमध्ये विविध गाणी नवीन नोट्सह
किंवा गाण्याचे नवीन रूप म्हणून वापरली जातात. त्याच प्रकारे, कॉपीराइट धारकाच्या परवानगीशिवाय विविध शैक्षणिक संसाधने एकत्रितपणे तयार
आणि उत्पन्न केली जाऊ शकतात आणि त्यांचे पुनर्वितरणही केले जाऊ शकते. एखादे शैक्षणिक संसाधने विकसित झाल्यावर मालक त्यास क्रिएटिव्ह कॉमन्स परवाने संलग्न
करतो, जेणेकरून कोणीही मालकाच्या परवानगीशिवाय जोडलेल्या परवान्याच्या आधारावर
त्यांचा वापर आणि पुनर्वापर करू शकेल. परंतु जेव्हा आपण एखाद्याचे शैक्षणिक
संसाधने वापरतो तेव्हा आपल्याला कॉपीराइट धारकास श्रेय देणे आवश्यक असते. आपण
मालकास श्रेय दिले नाही तर ते वाङमय चौर्य मानले जाते.
आपण आता विविध क्रिएटिव्ह कॉमन्स परवान्यांविषयी माहिती पाहू. क्रिएटिव्ह कॉमन्स परवान्यांचे सहा प्रकार आहेत. या परवान्यांमध्ये सार्वजनिक डोमेनमधील शैक्षणिक संसाधनांचा पुनर्वापर करताना इतर लोक त्याचा वापर करणाऱ्यांच्या हक्कांचे वर्णन करतात. या परवान्यांमध्ये शैक्षणिक संसाधनांशी संबंधित प्रतिबंध आणि निर्बंधांचे वर्णन आहे. या परवान्यांचे प्रतिबिंब दर्शविणारी चिन्हे खाली दिली आहेत:
पहिले प्रतीक आहे "अधिकार" (Attribution - BY): BY हे असे सूचित करते की आपण दुसर्याचे साहित्य/ सामग्री वापरल्यास आपण त्यांना श्रेय देणे आवश्यक आहे. अशा प्रकारे, आपण अन्य शैक्षणिक संसाधने वापरणार असू तर आपल्याला हे चिन्ह निर्विवादपणे वापरण्याची आवश्यकता आहे.
दुसरे प्रतीक "आहे तसे सामायिकरण" (Share-Alike-SA): SA हे असे सूचित करते की जेव्हा आपण आपले कार्य
वितरित, प्रदर्शित करतो
किंवा उपयोगात
आणतो आणि इतर लोक जेंव्हा त्याची
पुनर्मांडणी करतात तेव्हा ते वरील अटींची पूर्तता करून हवे तितके वितरन करतील.
याचा अर्थ असा की जेव्हा इतर लोक आपली सामग्री वापरतील तेव्हा त्यांना आपल्या
कार्याची नोंद करणे आवश्यक आहे आणि आपण आपल्या सामग्रीशी संलग्न केलेला परवाना
जोडणे आवश्यक असते. जर त्यांना इतर अटींसह पुनर्मांडणी करून स्वत:चे काम वितरित
करायचे असेल तर त्यांना प्रथम मूळ लेखकाची मंजूरी घेणे आवश्यक असते.
तिसरे प्रतीक "नक्कल नाही” (No Derivatives- ND): ND हे असे सूचित करते की, आपण आपल्या कामाच्या केवळ मूळ प्रती वितरित, प्रदर्शित केल्या आणि अंमलात आणल्या आहेत. याचा अर्थ असा होतो की इतर लोक आपल्या कार्याची पुनर्मांडणी करू शकत नाहीत (नक्कल तयार करू शकत नाहीत) आणि त्यांना आपल्या कामाची पुनर्मांडणी करायचे असेल तर शक्य तितकी आपली सामग्री वापरावी लागेल, त्यासाठी प्रथम आपल्याकडून रीतसर परवानगी घ्यावी लागेल.
चौथे प्रतीक "अ-व्यावसायिक" (Non-Commercial
-NC). NC हे असे सूचित करते
की, आपण आपले काम वितरित करणे, प्रदर्शित करणे
आणि नक्कल न करणे निवडले आहे आणि आपले काम व्यावसायिक हेतूसाठी वापरन्यास मनाई
असते. सदर परवाना अंतर्गत इतर व्यक्ती आपली सामग्री व्यावसायिकपणे वापरु शकत नाहीत
आणि आपली सामग्री त्यांच्या नावाने विक्रि करून आर्थिक फायदा मिळवू शकत नाहीत.
मुक्त शैक्षणिक संसाधनांमध्ये आपणास ही प्रतीके किंवा चिन्हांचा संच
दिसेल. इतर लोक मुक्त शैक्षणिक स्त्रोतांसाठी संलग्न परवान्याच्या आधारे माहिती
मिळवू शकतात. क्रिएटिव्ह कॉमन्सचे सहा
परवाने व त्यातील प्रत्येकाचा अर्थ खालीलप्रमाणे आहेः
१) अधिकार (Attribution- CC BY): हा परवाना आपल्या कामाचे वितरण, मिश्रण करण्यास अनुमती देतो. हे आपल्याला मौलिक निर्मितीचे
श्रेय देते आणि इतर लोक अधिकाधिक व्यावसायिक उपयोगासाठी वापर करू शकतो. हा परवाना
सर्वाधिक वापरला जाणारा प्रकार असून तो अधिकाधिक प्रसिद्धीसाठी वापरला जातो. समजा
आपण CC BY परवाना असलेले एखादे पॉवरपॉईंट सादरीकरण ऑनलाइन ठेवले आहे. इतर लोक याचा उपयोग आपल्या शैक्षणिक हेतूसाठी
करू शकतात परंतु सदर मालकास श्रेय देणे आवश्यक असते.
२) अधिकार (Attribution- CC BY-SA): हा परवाना इतरांना आपल्या कामाचे मिश्रण करण्यास, स्वतःचे कार्य
तयार करण्यास किंवा अगदी ते आपणास श्रेय देऊन व्यावसायिक वापरासाठी आणि समान परिस्थितीत
त्याच्या नवीन निर्मितीस परवानगी देते. या परवान्याची तुलना बर्याचदा "कॉपीलेफ्ट",
विनामूल्य किंवा मुक्त सॉफ्टवेअर परवाना स्त्रोताशी केली जाते. विकिपीडियाद्वारे
वापरलेला हा परवाना आहे आणि विकिपीडियामधील सामग्रीचा समावेश करुन तसेच परवानाधारक
प्रकल्पांसाठी फायदा होईल अशा सामग्रीसाठी वापरला आहे. आपण दुसर्याचे साहित्य वापरू
शकतो आणि आपण त्याची पुनर्मांडणी करू शकतो. परंतु पुनर्मांडणीनंतर आपण तसाच समान
परवाना देणे आवश्यक असते.
३) अधिकार (Attribution- CC BY-ND): हा परवाना जोपर्यंत तो कायम आहे तोपर्यंत व्यावसायिक आणि अव्यावसायिक
पुनर्वितरणास मान्यता आणि संपूर्णपणे आपणास श्रेय मिळेल. हे मुक्त परवाना
अधिकाराच्या विरुद्ध आहे. हा एकमेव परवाना आहे ज्याचा अर्थ असा आहे की आपल्याला
दुसर्याच्या कार्याचे श्रेय द्यावे लागेल परंतु सामग्रीत कोणत्याही बदलांची
परवानगी नसते. परंतु आपण इतरांची सामग्री व्यावसायिक, अव्यावसायिक शैक्षणिक
किंवा ते कोणत्याही कारणास्तव वापरू शकतो पण पूर्ण श्रेय परवाना मालकास द्यावे
लागेल. शैक्षणिक संदर्भात आपण विनामूल्य शैक्षणिक स्त्रोत व्हिडिओ ऑनलाइन वापरू शकतो.
परंतु आपला नवीन व्हिडिओ बनविताना मिश्रण किंवा त्यात सुधारणा करू शकत नाही आणि आहे
तसाच वापरावा लागतो.
४) अधिकार (Attribution- CC BY-NC): हा परवाना आपल्या कार्याचे इतर लोक मिश्रण आणि निर्मिती अव्यवसायिक हेतूने
करू शकतात पण त्याचे संपूर्ण श्रेय मात्र मूळ मालकाकडे राहते. त्यांचे काम पूर्णता
अव्यावसायिक असणे आवश्यक आहे, त्यांना त्याच
अटींवर त्याची नक्कल करण्यास परवानगी दिली जाते. आपण इतरांची अशी
सामग्री वापरू शकतो पण कोणत्याही व्यावसायिक उद्देशाने नाही. शैक्षणिक संदर्भात, आपण
शिकवण्याच्या उद्देशाने मुक्त शैक्षणिक स्त्रोत चित्रे वापरू शकतो. आपण त्या
चित्राशी संलग्न नवीन मजकूर देखील विकसित करू शकतो परंतु आपण त्याच्या आधारे पैसे
कमवू शकत नाही.
५) अधिकार (Attribution- CC
BY-NC-SA): हा परवाना
आपणास अव्यावसायिक कार्यासाठी मिश्रण आणि नवनिर्मिती करण्याची परवानगी मूळ मालकास
श्रेय देण्याच्या अटीवर देतात. नवीन निर्मिती केलेले साहित्य हे समान अटींवर परवाना
संलग्न करून शैक्षणिक संदर्भात सदर सामग्री वापरू शकतो म्हणजे आपण त्या
सामग्रीमध्ये मिश्रण, रुपांतरन आणि नवनिर्मिती करू शकतो. नवीन
सामग्री विकसित करताना समान परवाना असणे आवश्यक आहे आणि सामायिकरण सुविधा असणे
आवश्यक आहे नवीन सामग्री ही कोणत्याही व्यावसायिक हेतूसाठी वापरली जाऊ शकत नाही.
६ ) अधिकार (Attribution- CC BY-NC-ND): सहा मुख्य परवान्यांपैकी हा सर्वाधिक निर्बंध असलेला परवाना आहे, मूळ मालकास श्रेय देऊन केवळ डाउनलोड आणि इतरांना सामायिक केले जाऊ शकते. परंतु ते त्यात बदल करू शकत नाहीत किंवा त्यांचा व्यावसायिक वापर करू शकत नाहीत. नक्कीच मूळ मालकास "योग्य श्रेय" देणे आवश्यक आहे परंतु आपण कोणत्याही प्रकारे सदर कार्य आपल्या साहित्याशी जोडू आणि वितरित करू शकत नाही. जरी वितरण व्यावसायिक लाभासाठी नसले तरीही, शैक्षणिक संदर्भात, आपण इंटरनेटवर उपलब्ध मजकूर मूळ मालकास योग्य श्रेय देऊन वापरू शकतो. आपण मजकूर सुधारित करू शकत नाही किंवा व्यावसायिक हेतूंसाठी तो वापरू शकत नाही. खालील चित्रात आपणास पब्लिक डोमेन पासून सर्व हक्क सुरक्षितपर्यंतचे प्रतीके दिसत आहेत.
वरील सहा परवाने सोडल्यास शैक्षणिक संसाधनांचा कॉपीराइट संरक्षित नाही किंवा पूर्णपणे राखीव नाही. याचा अर्थ असा आहे की "पब्लिक डोमेन" चिन्ह असलेले शैक्षणिक संसाधने पब्लिक डोमेन परवानगीशिवाय कोणीही वापरु शकतो आणि मूळ मालकास श्रेय देण्याची गरज नाही. सर्व हक्क राखीव ठेवून शैक्षणिक संसाधने वापरण्याची परवानगी आवश्यक आहे. आज शैक्षणिक क्षेत्रात अमुलाग्र बदल झालेला दिसून येतो. संशोधन क्षेत्रातील दर्जा टिकविण्यासाठी काही महत्त्वाचे पावले उचललेली दिसतात. पीएचडीच्या संशोधनात वाङमय चौर्य रोखण्यासाठी यूजीसीने नवीन नियमावली अमलात आणलेली आहे. त्यानुसार दहा टक्क्यापर्यंत समानतेची पातळी गृहीत असून कोणताही दंड आकारण्यात येत नाही. मात्र 10 ते 40 टक्के समानता आढळल्यास संशोधकास सहा महिन्याच्या आत नवीन संशोधन प्रबंध सादर करावा लागतो. एखाद्या संशोधकाच्या प्रबंधात ४० टक्क्यांपेक्षा जास्त समानता आढळल्यास संशोधकाबरोबर मार्गदर्शकावरही कार्यवाही केली जाते. त्यामुळे शक्यतो संशोधकांनी आपल्या भाषेत लेखन केल्यास अशा प्रसंगांना तोंड द्यावे लागणार नाही.
(सदर लेखातील चित्र, इमेज Google वरून साभार)
अधिक वाचण्यासाठी पुस्तके:
Butcher, N. (2015). A Basic guide to open educational resources (OER), Frontenoy: UNESDOC Digital Library, ISBN: 978-1-894975-41-4
OECD (2007). Giving Knowledge for Free: The Emergence of Open Educational Resources, Paris: OECD
Slide Player (online content) retrieved from https://slideplayer.com/slide/14004104/
कुमार, अ. सी. (2018). मुक्त शैक्षणिक संसाधन, egyankosh, retrieved from dated July, 2020 http://egyankosh.ac.in//handle/123456789/46447
केंद्रीय विद्यालय इफको गांधीधाम लायब्ररी (online content) retrieved from July, 20 https://kviffcogimlibrary.wordpress.com/open-educational-resourc/
शैक्षिक संचार संकाय (online content) retrieved from http://cec.nic.in/cec/hindi/oer
खूप सुंदर विश्लेषण केले आहे सर त्याच्यामुळे नवीन शिकाऊ लोकांना याचा खरोखरच फायदा होईल यात शंका नाही
उत्तर द्याहटवाआपला खुप आभारी सर
हटवा