संदिग्धता प्रभाव | Ambiguity effects
आपण एखादी वस्तू ऑनलाईन खरेदी करत
असताना योग्य निर्णय घेण्यास अधिक चांगल्या प्रकारे माहिती रेटिंगद्वारे मिळू शकते.
एकाला सरासरी रेटिंग आहे, तर दुसर्याला अद्याप कोणतेही रेटिंग
नाही, कारण ते प्रोडक्ट नुकतेच अॅड झाले आहे. या परिस्थितीत, अनेक लोक
सरासरी रेटिंग असलेली वस्तू निवडतात. अद्याप कोणतेही पुनरावलोकन नसलेली वस्तू अधिक
चांगली असू शकते, तरीही आपण माहित असलेली गोष्ट मिळवत
आहोत हे जाणून घेणे आपणास चांगले वाटते. यालाच संदिग्धता प्रभाव
म्हणतात.
संदिग्धता प्रभाव
हा एक बोधनिक पूर्वग्रह आहे जिथे माहितीच्या अभावामुळे किंवा अस्पष्टतेमुळे निर्णय
घेण्यावर परिणाम होतो. या प्रभावाचा अर्थ असा होतो की लोकांचा कल हा अनुकूल
परिणामाची संभाव्यता ज्ञात आहे अशा पर्यायांची निवड करण्याकडे असतो ना की, ज्या पर्यायासाठी अनुकूल परिणामाची संभाव्यता अज्ञात असते. कारण आपण अनिश्चितता
नापसंत करतो आणि म्हणून विशिष्ट अनुकूल परिणाम साध्य करण्याची संभाव्यता ज्ञात आहे
असा निश्चित पर्याय निवडण्याकडे आपला अधिक कल असतो. डॅनियल
एल्सबर्ग यांनी प्रथम 1961 मध्ये या प्रभावाचे
वर्णन केले होते. एल्सबर्गने खालील प्रयोगाद्वारे हा प्रभाव
दाखवला:
कल्पना करा की एका बादलीमध्ये 90
चेंडू आहेत, त्यापैकी 30 लाल आहेत आणि बाकीचे काळ्या आणि पिवळ्या
चेंडूंचे अज्ञात प्रमाण आहे. आपणास 2 पर्यायांमधून निवडण्याची परवानगी आहे: जर A मधून त्याने लाल बॉल काढला तर तो $100 जिंकतो, पण जर त्याने
काळा किंवा पिवळा काढला तर तो $0 जिंकतो. किंवा B मधून जर त्याने पिवळा चेंडू काढला तर तो $100 जिंकतो. जर त्याने लाल किंवा
काळा काढला तर तो $0 जिंकतो.
आपण काय निवडाल? पर्याय A, कि पर्याय B?
जर तुम्ही A पर्याय निवडला
असेल तर लाल बॉल काढण्याची शक्यता 1/3 आहे.
जर तुम्ही B पर्याय निवडला असेल तर
पिवळा बॉल काढण्याची शक्यता देखील 1/3 आहे. याचे कारण असे की पिवळ्या बॉलची संख्या
0 ते 60 मधील सर्व शक्यतांमध्ये समान प्रमाणात वितरीत केलेली आहे.
येथे असे दिसून येते की बहुतेक लोक
पर्याय B ऐवजी A पर्यायावर पैज लावण्यास प्राधान्य देतील, दोन्हीमधील फरक
एवढाच आहे की A ला ज्ञात अनुकूल परिणाम आहे, तर पर्याय B मध्ये एक
संदिग्ध, अज्ञात अनुकूल परिणाम आहे. लोक पर्याय A पसंत करतात
कारण दोन्ही संभाव्यता समान असल्या तरीही तो अधिक निश्चित असल्याचे समजले जाते.
अगोदरच्या
काळी घर
खरेदी करताना, बरेच लोक एक निश्चित व्याज दर निवडत होते, जेथे व्याज दर
एका विशिष्ट कालावधीसाठी (सामान्यत: अनेक वर्षांसाठी) निश्चित केला जात होता, बदलते व्याज दर
ठेवण्याकडे लोकांचा कल नव्हता कारण येथे व्याज दरात बाजारानुसार चढ-उतार होण्याची शक्यता
असते. धोका कमी असलेल्या पर्यायाची निवड अधिक प्रमाणात केली जात होती. काळ बदलला तशी
लोकांची विचार करण्याची आणि निर्णय घेण्याची प्रवृत्ती देखील बदललेली आढळते.
अधिक
वास्तववादी उदाहरण म्हणजे लोक ज्या पद्धतीने पैसे गुंतवतात. जोखीम नको असलेले गुंतवणूकदार
त्यांचे पैसे सरकारी रोखे, सोने, स्थावर मालमत्ता आणि बँक ठेवी यांसारख्या
"सुरक्षित" गुंतवणुकीत ठेवतात,
शेअर बाजार, स्टॉक आणि फंड यांसारख्या अधिक अस्थिर गुंतवणुकीच्या विरोधात ते लोक
असतात. जरी शेअर बाजारातून कालांतराने लक्षणीयरीत्या जास्त परतावा मिळण्याची
शक्यता असली तरीही, गुंतवणूकदार स्पष्टता नसलेल्या शेअर
बाजाराऐवजी "सुरक्षित" गुंतवणुकीला प्राधान्य देतात कारण यामध्ये परतावा
ज्ञात आहे. पण प्रत्यक्षात जर आपण विशिष्ट शेअर्सचा अभ्यास करून दीर्घकाल शेअर बाजारामध्ये
पैसे गुंतविले तर त्याचे फायदे अगणित आहेत.
वैयक्तिक भिन्नता आणि संदिग्धता प्रभाव
संदिग्धतेचा
प्रभाव आपणास दोन व्यवहार्य पर्यायांचा समान विचार करण्यापासून रोखू शकतो. परिणामी
आपल्या निर्णय घेण्यावर परिणाम होतो. अज्ञात व्यक्तीवर विश्वास ठेवणे खूप धोकादायक
आहे असे आपणास वाटते या वस्तुस्थितीवर आधारित आपण आपोआपच एखाद्या गोष्टीविरुद्ध निर्णय
घेऊ शकतो. या बोधात्मक पूर्वग्रहात गुंतल्याने आपले विचार मर्यादित होतात, कारण आपणास हे धोकादायक निर्णयांचे दीर्घकालीन फायदे मिळविण्यापासून
प्रतिबंधित करतात .
संदिग्धतेच्या प्रभावामुळे
जोखीम टाळणे याकडे जरी आपला कल असला तरी, निर्णय घेणार्याकडे किती माहिती आहे यावरून दोन पूर्वग्रहातील भेदभाव केले
जातात. आपल्याकडे उपलब्ध पर्यायांपैकी फक्त एकासाठी विशिष्ट परिणामाची संभाव्यता
माहित असते तेंव्हा संदिग्धता प्रभाव होतो. आपणास दोन्ही संभाव्यता माहित असतात
आणि कमी मोबदला असलेल्या परंतु यशाची अधिक शक्यता असलेल्या पर्यायाकडे आकर्षण असते
तेंव्हा जोखीम टाळण्याकडे कल असतो. दोन्ही प्रकरणांमध्ये, आपण
धोकादायक मानत असलेले पर्याय निवडण्याची आपली नापसंती फलदायी निर्णय घेण्याची आपली
क्षमता मर्यादित करू शकतात.
सुरक्षितता आणि असुरक्षितता
पद्धतशीर विचार हे आपल्या
दैनंदिन जीवनात केलेल्या छोट्या निवडींवर प्रभाव टाकू शकतात, परंतु त्याचा
निर्णय घेण्यावरही मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडतो. यामुळे शाळा, कंपन्या आणि शासकिय
यंत्रणा सुधारणा करण्याच्या दृष्टीने नवीन धोरणे किंवा कार्यक्रम सादर करण्याऐवजी
अपयशी प्रणालींला चिकटून राहतात. जरी हे बदल सिस्टीमला अधिक चांगल्या प्रकारे
कार्य करण्यास मदत करतील तरी, गोष्टी चुकीच्या मार्गावर जाणार
नाहीत याची शाश्वती नसणे आणि शेवटी नवीन काही सुरू करण्याने आहे ती स्थिती वाईट
होईल या कारणाने जैसे थे नियम राबवविले जाते. जरी वर्तमान प्रणाली इष्टतम नसली
तरीही, बदल लागू करण्यापेक्षा तिच्याशी चिकटून राहणे अधिक सुरक्षित वाटते, कारण ते ज्ञात
आहे आणि त्याचा अधिक अंदाज लावता येतो. जोखीम न घेण्याचा निर्णय घेऊन या कृती
करण्याकडे दुर्लक्ष केल्याने संस्थांना आणि ज्या लोकांना त्यांचा फायदा होणार आहे त्यांना
मोठ्या प्रमाणात खर्च होऊ शकतो.
असे का घडत असावे?
इतर बोधनिक
पूर्वग्रहांप्रमाणे, संदिग्धता प्रभाव का
होतो यामागे अनेक सिद्धांत आहेत. एक म्हणजे हा एक व्यावहारिक नियम (Rule
of thumb) आहे जो जलद, सहज निर्णय
घेण्यासाठी आणि समस्या सोडवण्यासाठी उपयुक्त आहे. आणखी एक म्हणजे संदिग्धता
टाळण्याची उच्च पातळी, एक सामान्य वर्तन ज्यामध्ये आपल्यापैकी
बरेच जण गुंतलेले असतात, ज्यामुळे लोकांना हा पूर्वग्रह घडण्याची
अधिक शक्यता असते.
व्यावहारिक नियम (Rule
of thumb)
व्यावहारिक नियम
म्हणजे संदिग्धता प्रभाव निर्णय घेण्याच्या सोयीसाठी वापरला जाणारा नवगामी परिणाम (प्रयत्न प्रमाद पद्धती) आहे.
नवगामी विचाराप्रमाणे, हे समस्या सोडविण्याच्या
सामान्य दृष्टिकोनाचे वर्णन करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्व म्हणून कार्य करते. ही
रणनीती आपोआप आणि सहजतेने उद्भवते आणि आपल्याला लवकर निष्कर्षापर्यंत पोहोचण्यास
मदत करू शकते. नवगमी विचार तोपर्यंत टिकून राहतात जोपर्यंत ते बरोबर असतात. तथापि,
त्यांचा वापर करून, आपण चुकीचा किंवा चुकीची
माहिती असलेला निष्कर्ष काढण्याचा धोका पत्करतो, कारण आपण तर्क
आणि अनुमान वापरण्यात अयशस्वी होतो.
एका
मर्यादेपर्यंत, संदिग्धता प्रभाव हा एक अनुकूल
प्रतिसाद आहे. अनेक लोक कल्पनेवर आधारित पर्यायांपेक्षा त्यांना चांगल्या प्रकारे
माहिती असलेल्या पर्यायांना प्राधान्य देतात. आपल्याकडे खरोखर खूप कमी माहिती आहे
त्यावेळी हे पर्याय टाळण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. याहूनही चांगले, अस्पष्टता परिणाम आपल्याला अस्पष्ट पर्यायाबद्दल अधिक माहिती मिळविण्यास
प्रवृत्त करू शकतो, जेणेकरून अधिक माहितीपूर्ण निर्णय घेता
येईल.
व्यावहारिक
नियम काही प्रसंगी कार्य करतो. असे म्हटले जात आहे की, या नवगामी विचारावर जास्त अवलंबून राहणे आदर्श नाही. फ्रिश आणि बॅरन यांच्या
संशोधनानुसार, संदिग्धता प्रभाव हा फ्रेमिंग प्रभावाचा एक
प्रकार आहे, जसे की त्यातील काही अज्ञात घटकांकडे लक्ष वेधून
किंवा दूर करून कोणताही पर्याय संदिग्ध किंवा अस्पष्ट वाटू शकतो. मूलत:, एखाद्याला दिलेल्या पर्यायाबद्दल सर्व काही माहित नसते. असा विश्वास ठेवणे
हे फक्त "कोणती माहिती असू शकते याबद्दल कल्पनेच्या अभावाचा परिणाम असू
शकतो." अशा प्रकारे, या नवगामी विचाराचा वापर करून
निर्णय घेणे निश्चितच सोपे होते, परंतु ते जवळजवळ विश्वसनीय
किंवा प्रभावी नाही.
आपल्या
जीवनात याचे महत्व काय आहे?
इतर
कोणत्याही बोधनिक पूर्वग्रहाप्रमाणे जेथे निर्णय घेण्याशी तडजोड केली जाते, संदिग्धतेचा प्रभाव काय आहे आणि त्याचा आपल्यावर कसा प्रभाव पडतो हे समजून
घेणे महत्त्वाचे आहे. कारण आपण या पूर्वग्रहात गुंतलेले आहोत का हे ओळखण्याची
क्षमता विकसित करण्याच्या दिशेने काम करू शकतो. ही जागरूकता आपणास हा पूर्वग्रह
पूर्णपणे टाळण्यास मदत करेल, ज्यामुळे आपणास तर्काच्या आधारे
योग्य निर्णय घेणे शक्य होईल.
संदिग्धतेचा
प्रभाव कसे टाळता येईल?
स्वतःला
मर्यादित न ठेवण्यासाठी, संदिग्ध पर्याय आणि
परिस्थिती टाळण्यासाठी आपण आपल्या सुरुवातीच्या प्रबळ इच्छा नजर अंदाज करायला
शिकले पाहिजे. कोणत्याही नवगामी विचाराप्रमाणे, असे करण्याची
पहिली पायरी म्हणजे त्याचे अस्तित्व आणि आपल्या निर्णय क्षमतेवर त्याचा प्रभाव
ओळखणे.
नवगामी
विचार आपणास सहजतेने आणि आपोआप निर्णय घेण्याची परवानगी देत असले तरीही, संदिग्धता प्रभाव टाळण्याचा एक प्रमुख भाग म्हणून निर्णय घेण्यास आवश्यक वेळ
घेणे गरजेचे आहे. आपण एका दिवसात असंख्य माहिती आणि अनेक पर्यायांचा सामना करतो,
त्यामुळे आपल्या मानसिक संसाधनांचे योग्य विल्हेवाट लावण्याचा हा एक
प्रभावी मार्ग असू शकतो. तथापि, काही निर्णय घेण्यास अधिक
मेहनत घ्यावी लागते. कमी अस्पष्ट पर्याय सुरुवातीला अधिक इष्ट वाटू शकतो, परंतु, फ्रिश आणि बॅरनने निदर्शनास आणल्याप्रमाणे,
आपणास वाटते त्यापेक्षा कमी माहिती असू शकते. परिस्थितीचा पुन्हा
नव्याने विचार केल्याने असे दिसून येईल की कमी अस्पष्ट पर्याय दिसत होता तितका तो श्रेष्ठ
नाही. शिवाय, अधिक संदिग्ध पर्यायाचे मूल्यांकन करताना,
केवळ काय चूक होऊ शकते यावरच नव्हे तर काय बरोबर असू शकते यावर
देखील लक्ष केंद्रित करणे महत्वाचे आहे. जेव्हा संदिग्धतेचा सामना करावा लागतो,
तेव्हा आपण सर्वात वाईट परिस्थितीची कल्पना करतो, हे विसरतो की हा परिणाम सर्वोत्तम परिस्थिती असू शकतो.
समारोप
संदिग्धता
प्रभाव हे आपल्याकडे किती माहिती आहे याचा निर्णय घेण्यावर कसा प्रभाव पडतो यांचे वर्णन
करतो. विशेषत:, आपल्याकडे माहितीची कमतरता असते त्या
पर्यायांचा तिरस्कार असतो. संदिग्धता प्रभाव हे पर्याय टाळण्यासाठी नवगामी विचार असू
शकतात ज्यासाठी आपणास वाटते की आपल्याकडे पुरेशी माहिती नाही. याव्यतिरिक्त,
उच्च पातळीच्या संदिग्धता टाळणारे लोक हे वर्तन व्यक्त करण्याची
अधिक शक्यता असते. संदिग्धता प्रभाव टाळण्यासाठी, आपण निर्णय
घेण्यासाठी प्रयत्नशील, सक्रिय दृष्टीकोन घेतला पाहिजे. कमी
अस्पष्ट पर्याय आपोआप निवडण्याऐवजी, त्या
पर्यायाबद्दल आपल्याला काय माहित नाही ते माहिती करून घेतले पाहिजे, तसेच अधिक
अस्पष्ट पर्याय निवडण्याचे संभाव्य फायदे देखील ओळखले पाहिजेत.
संदर्भ
Ellsberg,
D. (1961). Risk, ambiguity, and the Savage axioms. The
quarterly journal of economics, 75(4), 643-669.
Frisch,
D., & Baron, J. (1988). Ambiguity and rationality.
Journal of Behavioural Decision Making, 1(3), 149-157.
Howard,
J. (2018). Ambiguity Effect. Cognitive Errors and
Diagnostic Mistakes: A Case-Based Guide to Critical Thinking in Medicine. 15-19. doi: 10.1007/978-3-319-93224-8_2
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thank you for your comments and suggestions