फिनियस
गेझ | Phineas Gage: A Case
केस स्टडी (वृत्त अभ्यास) म्हणजे
एखाद्या व्यक्ती, गट किंवा घटनेचा सखोल अभ्यास होय.
एका केस स्टडीमध्ये, विषयाच्या (case) जीवनातील आणि
इतिहासातील जवळजवळ प्रत्येक पैलूचे विश्लेषण केले जाते, जेणेकरून
वर्तनाचे नमुने आणि कारणे शोधता येतील. यामध्ये त्या व्यक्तीच्या जीवनातील विविध
पैलूंचा अभ्यास करून त्यातून मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून माहिती गोळा केली जाते.
यात मुलाखती,
निरीक्षणे, वैद्यकीय अहवाल, चाचण्या यांचा समावेश असतो. केस स्टडी विविध क्षेत्रांमध्ये वापरल्या जाऊ
शकतात, ज्यामध्ये मानसशास्त्र, वैद्यकीय शास्त्र, शिक्षण, आणि सामाजिक
कार्य यांचा समावेश आहे. केस स्टडीचा उद्देश म्हणजे एखाद्या व्यक्ती किंवा
गटाबद्दल जितके शक्य तितके जाणून घेणे, जेणेकरून ती
माहिती इतर अनेक लोकांसाठी सामान्यीकरण करता येईल.
केस स्टडीद्वारे एखाद्या व्यक्तीच्या
जीवनातील मानसिक प्रक्रिया, वर्तन, अनुभव यांची
सखोल समज मिळते. हे विशेषतः दुर्मिळ किंवा जटिल परिस्थितींच्या अभ्यासासाठी
उपयुक्त ठरते. केस स्टडीवर आधारित मानसशास्त्रातील अनेक सिद्धांतांचा विकास झाला
आहे. उदाहरणार्थ, सिग्मंड फ्रॉईड यांच्या मनोविश्लेषण
तत्त्वज्ञानाचे अनेक पैलू त्यांच्या केस स्टडीवर आधारित आहेत. काही वेळा प्रयोग करणे नैतिक किंवा व्यावहारिक
दृष्ट्या अशक्य असते. अशा परिस्थितीत केस स्टडी एक चांगला पर्याय ठरतो, कारण यामध्ये
नैतिकता राखून अभ्यास करता येतो. केस स्टडीमधून
नवीन सिद्धांतकल्पना निर्माण होतात, ज्यांना पुढील
संशोधनामध्ये तपासता येते. केस स्टडी अभ्यासांमधून मिळालेली माहिती थेट उपचार
पद्धतींमध्ये वापरता येते. उदाहरणार्थ, फिनियस गेझ (Phineas Gage) याच्या ब्रेन
इंजुरीच्या केस स्टडीमुळे मेंदूच्या कार्य आणि व्यक्तिमत्वाच्या संबंधातील आपले
ज्ञान वाढलेले आहे. त्याविषयीची माहिती पुढीलप्रमाणे: