जीवन-कल्याणाचे
मूलभूत घटक | Wellbeing: The Five Essential
Elements
रजनीश
ओशो यांनी कोलकात्याच्या एका श्रीमंत माणसाच्या अलिशान घराची सांगितलेली गोष्ट
माणसाच्या मानसिकतेवर प्रकाश टाकते. या गोष्टीत ओशो सांगतात की सुरुवातीला त्या
श्रीमंत माणसाला त्याचं मोठं, आलिशान घर बघून खूप
आनंद होत होता. त्याला स्वत:च्या संपत्तीचा आणि यशाचा अभिमान होता. ते येणाऱ्या
प्रत्येक माणसाला आनंदाने आपले घर, वस्तू, आणि सजावटीचे साहित्य दाखवून आनंदी होत होते. पण एके दिवशी, त्याच्या घरासमोर आणखी एक भल मोठं, त्याच्या पेक्षा
जास्त आलिशान घर बांधलं गेलं. त्यानंतर मात्र त्याचं समाधान आणि आनंद गायब झालं,
आणि तो निराश आणि असमाधानी राहू लागला.