आपण ‘ब्रेन
रॉट’ चे शिकार झालेले आहात का?
ऑक्सफर्ड
युनिव्हर्सिटी प्रेसने 2024 चा ऑक्सफर्ड वर्ड
ऑफ द इयर म्हणून ‘ब्रेन रॉट’ (Brain Rot) या शब्दाची निवड केली आहे. या निवडीसाठी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने तयार
केलेल्या सहा शब्दांच्या यादीस 37,000 हून अधिक लोकांनी
मतदान केले. ‘ब्रेन रॉट’ हा शब्द किरकोळ सोशल मीडिया सामग्रीच्या वापरामुळे मानसिक आरोग्यावर होणाऱ्या
परिणामांबद्दल वाढती चिंता अधोरेखित करतो. ऑक्सफर्ड
युनिव्हर्सिटी प्रेसच्या यादीतील इतर शब्दांमध्ये demure, dynamic pricing, lore, romanticism, and slop. यांचा समावेश होता.
ब्रेन रॉट (Brain Rot) म्हणजे
काय?
"ब्रेन रॉट"
हा एक आधुनिक, अनौपचारिक शब्द
आहे, जो सामान्यतः मानसिक थकवा, एकाग्रतेचा अभाव, आणि
मेंदूच्या कार्यक्षमतेत घट होण्याच्या संदर्भाने येतो. हा शब्द वैद्यकीय
दृष्टिकोनातून वापरला जात नाही, तर
अधिकतर इंटरनेट संस्कृतीमध्ये आणि अनौपचारिक संभाषणांमध्ये वापरला जातो. ब्रेन रॉटचा अर्थ वेगवेगळ्या संदर्भात बदलतो. हा शब्द दोन मुख्य प्रकारांमध्ये विभागता
येईल:
- मानसिक थकवा (Mental Fatigue): कामाचा अतिवापर, सतत स्क्रीनसमोर वेळ घालवणे, किंवा काही ठराविक प्रकारच्या सामग्रीचा सतत सामना यामुळे निर्माण होणारी मानसिक स्थिती.
- विचारांमधील जडत्व (Cognitive Stagnation): व्यक्ती आपल्या नेहमीच्या सर्जनशील विचारसरणीतून बाहेर पडत नाही, किंवा सतत व्यर्थ, मनोरंजनात्मक सामग्रीकडे झुकते.
आजकाल, इंटरनेट हा आपल्या जीवनाचा इतका महत्त्वाचा भाग बनला आहे की त्याशिवाय जीवनाची कल्पना करणे कठीण आहे. पण या इंटरनेटच्या जगात रील आणि शॉर्ट्स नावाची दोन भुतेही आहेत. नावे भिन्न असू शकतात, परंतु दोघांचे काम एकच आहे - आपला वेळ वाया घालवणे. आज आपण हे ज्ञान का शेअर करायला सुरुवात केली आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. खरं तर, विचार न करता सोशल मीडियावर या सतत स्क्रोलिंगसाठी एक संज्ञा वापरली जाते ती म्हणजे- ब्रेन रॉट.
चेताविज्ञानाच्या
(Neuroscience)
दृष्टीने "ब्रेन रॉट"
- सतत
मनोरंजनासाठी सोशल मीडिया, व्हिडिओ गेम्स किंवा इतर डिजिटल
साधनांचा वापर डोपामिन स्तरात वाढ घडवून आणतो. यामुळे "तत्काळ समाधान"
मिळण्याची सवय लागते, जी दीर्घकालीन लक्ष केंद्रीत
क्षमतेसाठी हानिकारक ठरते.
- डोपामिन
प्रणालीचा जास्तीत जास्त वापर मेंदूतील 'रीवॉर्ड सर्किट'
कमकुवत करू शकतो, ज्यामुळे "ब्रेन
रॉट" ची भावना येऊ शकते.
- बौद्धिक
संसाधन मर्यादित असते. सतत माहितीचा भडिमार (जसे की 24/7 स्क्रीन टाइम) मेंदूच्या
माहिती प्रक्रिया क्षमतेवर परिणाम करतो. यामुळे स्मरणशक्ती कमी होते, कारण कमी महत्त्वाची माहिती आणि महत्त्वाची माहिती यामध्ये गोंधळ होतो.
- ठराविक
प्रकारचे विचार आणि कृती वारंवार केल्याने मेंदूच्या संरचनेत बदल होतो (neuroplasticity).
उदाहरणार्थ, सतत फास्ट-फूडसारख्या उत्तेजक
गोष्टींवर अवलंबून राहिल्यास निर्णयक्षमता आणि कल्पकतेशी संबंधित क्षेत्रे दुर्बल
होऊ शकतात.
- दीर्घकालीन
ताण किंवा अति-ताणामुळे मेंदूत कॉर्टिसोलचे प्रमाण वाढते, ज्यामुळे हिप्पोकॅम्पस (स्मरणशक्तीसाठी महत्त्वाचे क्षेत्र) ला हानी
पोहोचते. हे स्मृतिभ्रंशासारखी लक्षणे विकसित करू शकते.
- मेंदूचा रक्तप्रवाह सुधारण्यासाठी आणि न्यूरॉन्सची कार्यक्षमता टिकवण्यासाठी शारीरिक क्रियाशीलता अत्यावश्यक आहे. व्यायामाचा अभाव "ब्रेन रॉट" ची शक्यता वाढवतो.
उगम
कसा झाला?
ब्रेन रॉट हा शब्द सुमारे 170 वर्षांपूर्वी वापरला
गेला होता. 1854 मध्ये लिहिलेल्या हेन्री डेव्हिडच्या वॉल्डन या पुस्तकात या
शब्दाचा प्रथम उल्लेख करण्यात आला होता. समाजाच्या वरवरचा खरपूस समाचार घेत
त्यांनी हे पुस्तक लिहिले. पण प्रत्यक्षात "ब्रेन रोट" या शब्दाचा उगम
मुख्यतः इंटरनेट संस्कृतीतून झाला आहे. 2010 च्या दशकात सोशल मीडियाच्या वेगाने
झालेल्या प्रसारासोबत, लोक
मोठ्या प्रमाणावर इंटरनेटवरील व्यर्थ सामग्रीमध्ये गुंतलेले आहेत.
- सोशल मीडियाचा प्रभाव: TikTok, Instagram Reels, आणि YouTube Shorts यांसारख्या प्लॅटफॉर्मवर सतत छोटी आणि वेगवान मनोरंजन सामग्री पाहण्याने हा शब्द प्रचलित झाला. लोक अशा प्रकारच्या सामग्रीला "ब्रेन रॉट सामग्री" म्हणून ओळखतात, कारण ती सर्जनशील किंवा बौद्धिक विचारांपेक्षा फक्त आनंदासाठी असते.
- अनौपचारिक वापर: ही संज्ञा सुरुवातीला गमतीशीर किंवा उपहासात्मक पद्धतीने वापरली जात होती, पण आता तिचा वापर वैयक्तिक अनुभव आणि मानसिक आरोग्याच्या चर्चेत होताना दिसतो.
- आधुनिक जीवनशैली: झपाट्याने बदलणाऱ्या डिजिटल युगात लोक सतत स्क्रीनकडे आकर्षित होत असल्याने, हा शब्द त्यांच्या जीवनातील वास्तव दर्शवू लागला आहे.
ब्रेन
रॉटच्या दुष्परिणामांचे स्वरूप
ब्रेन रोटचे परिणाम मानसिक आरोग्यावर, व्यक्तिमत्त्वावर, आणि समाजाशी संबंधांवर लक्षणीय
परिणाम करतात.
1.
मानसिक आरोग्यावर परिणाम:
सततची माहिती ओव्हरलोडमुळे मेंदू माहिती साठवून
ठेवण्यात अयशस्वी होतो त्यामुळे स्मरणशक्ती कमकुवत होते. तासन्तास स्क्रीनकडे बघणे, किंवा व्यर्थ सामग्री पाहणे एकाग्रता कमी करते. उपयोगी माहितीपेक्षा
निरर्थक सामग्रीचा अतिरेक मेंदूला अस्थिर करतो त्यातून तणाव आणि चिंता वाढीस
लागते.
2. सामाजिक संबंधांवर परिणाम:
लोक सतत मोबाईल वापरत असल्यामुळे वास्तविक संवाद कमी
होत आहे,
एका इंटरनेट सर्व्हेनुसार
संवाद कौशल्यात घटझालेली आहे असे निष्कर्ष आढळून आलेले आहेत. डिजिटल
माध्यमातील गुंतवणूकमुळे वास्तविक आयुष्यातील नातेसंबंध दुर्बल होतात आणि कुटुंब
आणि मित्रांपासून दुरावा निर्माण होतो.
3.
शारीरिक परिणाम:
सतत स्क्रीनकडे बघण्यामुळे डोळ्यांची थकवा व
दृष्टीदोष यासारखे दुष्परिणाम वाढलेले आहेत. अधिक वेळ एका ठिकाणी बसण्यामुळे
होणारे आजार वाढलेले आहेत. त्यामुळे वेळेवर व्यायाम न केल्याने लठ्ठपणा, मधुमेह, किंवा हृदयविकाराचा धोका वाढतो आहे.
यावर
उपाय काय आहेत?
ब्रेन
रोट टाळण्यासाठी काही महत्त्वाच्या उपाय-योजना केल्या जाऊ शकतात:
1.
डिजिटल डिटॉक्स (Digital Detox):
- नियमितपणे
मोबाईल,
लॅपटॉप यांसारख्या डिव्हाइसेसपासून ब्रेक घ्या.
- आठवड्यातून किमान एक दिवस "नो-स्क्रीन डे" ठेवा.
2.
एकाग्रता सुधारण्यासाठी तंत्र:
- मेडिटेशन आणि योगा: ध्यान करण्याने मेंदू शांत राहतो.
- पोमोडोरो तंत्र: कामाच्या दरम्यान 30 मिनिटे काम आणि 5 मिनिटे विश्रांती यामुळे कार्यक्षमतेत वाढ होते.
3.
सर्जनशील कार्यांमध्ये गुंतवणूक:
- पुस्तकं
वाचा,
लेखन करा, किंवा नवीन कौशल्यं शिका.
- जास्तीत जास्त वेळ क्रिएटिव्ह कामांसाठी काढा.
4.
सामाजिक संवाद वाढवा:
- कुटुंब आणि मित्रांसोबत जास्त वेळ घालवा, त्यांच्यासोबत भावनिक नाते निर्माण करा.
- डिजिटल
प्लॅटफॉर्मवर कमी आणि प्रत्यक्ष गप्पांवर अधिक भर द्या. Online भेटीगाठी कमी करून प्रत्यक्ष भेटणे अत्यावश्यक आहे.
5.
झोपेची गुणवत्ता सुधारवा:
- पुरेशी आणि नियमित झोप घेतल्याने मेंदू ताजेतवाने राहतो.
- झोपायच्या दोन तास आधी स्क्रीनपासून दूर रहा आणि सकाळी उठल्यावर अत्यावश्यक असेल तरच फोन घ्या.
आपण ‘ब्रेन रॉट’ चे शिकार झालेले आहात का?
तुम्हाला सकाळी लवकर फोन चेक करण्याची सवय आहे का? तुमचा फोन तपासत असताना तुम्ही अचानक सोशल मीडियावर
जाता आणि मग अर्ध्या-एका तासानंतर तुम्हाला लक्षात येते की तुम्ही अजून अंथरुणातून
उठलेले नाही? तुम्ही
बसून, उभे असताना किंवा कुठेही पडून
असताना तुमच्या फोनवर रील्स किंवा शॉर्ट्स स्क्रोल करणे सुरू करता? जर होय, तर
तुम्ही मेंदूच्या निष्क्रियतेचे बळी आहात.
प्रत्यक्षात काय घडते ते म्हणजे सोशल मीडियावर
कंटेंटचा भरणा आहे. तुम्ही कोणत्याही रील किंवा व्हिडिओवर सरासरीपेक्षा 2 सेकंद
जास्त खर्च केल्यास, संबंधित
ॲपच्या अल्गोरिदमला समजते की तुम्हाला एखाद्या विशिष्ट श्रेणीतील व्हिडिओ आवडतात.
आता अशा अनेक रील्स आणि कंटेंट तुमच्या स्क्रीनवर पसरतात. स्क्रोल करताना, तुम्ही पाहत असलेला मजकूर तुमच्यासाठी उपयुक्त आहे की
नाही हे देखील तुम्हाला लक्षात येत नाही. हीच परिस्थिती आहे ज्यामध्ये आपण काहीही
न समजता किंवा विचार न करता सामग्री स्क्रोल करत आहोत, कारण तेच स्क्रीनवर येत आहे आणि आपण सोशल मीडियाच्या
दुनियेत डुंबत आहात.
तुम्हाला वाटते की अजून काही मिनिटे, अजून काही रील... पण जोपर्यंत तुम्हाला दुसरे काम
आठवत नाही किंवा आई येऊन सांगते की तुम्ही बरेच तास या कामात व्यस्त आहात. ब्रेन
रॉट हा शब्द या मानसिक रॉटला सूचित करतो, ज्यामध्ये
तुम्ही कोणत्याही अर्थाशिवाय कमी दर्जाची सामग्री पुनःपुन्हा पाहात आहात. पुढे 15 विधानांची एक चाचणी
दिलेली आहे, यामध्ये प्रत्येक विधानासाठी सहमत/असहमत आधारित स्केल (जसे 1 =
पूर्णपणे असहमत, 5 =
पूर्णपणे सहमत) आहे.
- मी दिवसातील बहुतांश वेळ डिजिटल उपकरणांवर घालवतो.
- स्क्रीनसमोर खूप वेळ घालवल्यानंतर मला मानसिक थकवा जाणवतो.
- मी सतत सोशल मीडियावरच्या नोटिफिकेशन्स तपासत असतो.
- माझी स्मरणशक्ती पूर्वीपेक्षा कमी झाल्याचे मला जाणवते.
- मी नेहमीच निरर्थक माहिती (उदा. मीम्स, विनोद) पाहण्यात वेळ घालवतो.
- स्वतःच्या जीवनाबद्दल असमाधानता वाढली आहे.
- मला सतत कोणत्यातरी गोष्टीसाठी (डिव्हाइस वापराशिवाय) एकाग्र होण्यात अडचण येते.
- स्क्रीनसमोर बसल्यामुळे माझ्या झोपेच्या वेळेत अडथळा येतो.
- मी ऑफलाइन कामांवर किंवा संवादावर फारसा वेळ देत नाही.
- मी अनेकदा वेळ वाया घालवल्याची भावना व्यक्त करतो.
- सोशल मीडियामुळे मला लोकांशी प्रत्यक्ष संवाद साधण्यात अडचण येते.
- डिजिटल ब्रेक घेतल्यावर मला अधिक ताजेतवाने वाटते.
- मला सतत इंटरनेट वापरण्याची सवय लागली असल्याचे जाणवते.
- डिजिटल माध्यमांमुळे माझ्या मूळ स्वभावात बदल झाल्यासारखा वाटतो.
- स्क्रीनवर घालविलेल्या वेळेचा परिणाम माझ्या शारीरिक आरोग्यावरही जाणवतो (उदा. डोळ्यांचा थकवा, पाठदुखी इ.).
गुणांक
विश्लेषण:
प्रत्येक विधानास प्रतिसाद दिल्यावर (1 = पूर्णपणे
असहमत, 5 = पूर्णपणे सहमत) प्रतिसादानुसार 1-5
गुण देणे. सर्व गुणांची बेरीज करून एकूण गुण मिळतील त्यांची वर्गवारी खालीलप्रमाणे:
15–35
गुण: कमी प्रभाव.
36–55
गुण: मध्यम प्रभाव.
56–75
गुण: उच्च प्रभाव.
ब्रेन रॉटचा
प्रभाव जर आपल्यावर कमी असेल तर चांगली गोष्ट आहे पण का तो उच्च पातळीवर असेल तर
मानसशास्त्रज्ञ किंवा मानसशास्त्रीय समुपदेशकाची मदत घ्या.
समारोप:
ब्रेन रॉट हा फक्त एक शब्द नसून, तो आधुनिक समाजाच्या जीवनशैलीचा परिणाम आहे. डिजिटल माध्यमांचा अतिरेक, मनोरंजनात्मक सामग्रीचा सततचा वापर, आणि कामाचा ताण यामुळे हा प्रकार वाढत आहे. ब्रेन रॉटचे दुष्परिणाम मानसिक, शारीरिक, आणि सामाजिक पातळीवर दिसून येत आहेत. मात्र, योग्य वेळेवर उपाययोजना केल्यास आपण हा त्रास टाळू शकतो आणि आपले मानसिक आरोग्य टिकवून ठेवू शकतो. या समस्येवर मात करण्यासाठी स्वयंशिस्त आणि संतुलित जीवनशैली महत्त्वाची आहे. डिजिटल युगाचा सकारात्मक उपयोग करून आपले आयुष्य अधिक अर्थपूर्ण कसे बनवायचे, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
संदर्भ:
Kogan, J. (2023). Is social media giving you brainrot? Verywell Mind.
Retrieved from https://www.verywellmind.com
Oxford
Academic. (2023). Digital media and mental health:
Exploring the impact of screen time on cognitive and emotional outcomes.
Psychological Research Advances. Retrieved from https://academic.oup.com
UNSW. (2023). Screen time, mental health, and lifestyle factors: A
comprehensive review. University of New South Wales Newsroom. Retrieved from
https://newsroom.unsw.edu.au
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thank you for your comments and suggestions