शुक्रवार, ३१ जानेवारी, २०२५

वास्तव स्वीकारा आणि त्याचा सामना करा | Embrace Reality and Deal with It

 

वास्तव स्वीकारा आणि त्याचा सामना करा

दोन मित्र प्रवास करत होते. वाटेत काही कारणावरून त्यांचे भांडण झाले आणि एकाने दुसऱ्याच्या गालावर एक जोराचा थप्पड मारला. ज्याला मार बसला, त्याने काही न बोलता वाळूत लिहिले, "आज माझ्या मित्राने मला मारले."

ते एकमेकाशी काहीही न बोलता पुढे चालले असता, गालावर मार बसलेला मित्र दलदलीत अडकला आणि दुसऱ्याने त्याला वाचवले. तेव्हा त्याने एका दगडावर कोरले, "आज माझ्या मित्राने माझे प्राण वाचवले."

त्याच्या मित्राने विचारले, "मार खाल्ल्यावर वाळूत का लिहिलंस आणि मदत मिळाल्यावर दगडावर कोरलंस?" त्याने उत्तर दिले, "वाईट गोष्टी वाळूत लिहाव्यात जेणेकरून त्या सहज नष्ट होतील, आणि चांगल्या गोष्टी दगडावर कोराव्यात जेणेकरून त्या कायम स्मरणात राहतील." वास्तव स्वीकारा आणि दुःख वाळूवरील रेषेसारखे विसरून जा, पण चांगल्या गोष्टी कायम स्मरणात ठेवा.

मंगळवार, २८ जानेवारी, २०२५

स्वकेंद्रितता प्रवृत्ती (Narcissistic): मानसशास्त्रीय विश्लेषण

 

स्वकेंद्रितता प्रवृत्ती (Narcissistic): मानसशास्त्रीय विश्लेषण

अडॉल्फ हिटलर हा स्वकेंद्रित प्रवृत्तीसाठी एक अत्यंत ठळक ऐतिहासिक उदाहरण आहे. त्याचे वर्तन, निर्णय, आणि नेतृत्वशैली स्वकेंद्रिततेच्या अनेक पैलूंना उजळून टाकतात. हिटलरचा जीवनप्रवास आणि त्याचे राजकीय धोरण हाच दर्शवतो की स्वकेंद्रित प्रवृत्तीचा अतिरेक कसा संपूर्ण समाजासाठी विनाशकारी ठरतो.

हिटलरने स्वतःला एक "मेसायाह" (तारणकर्ता) म्हणून सादर केले. त्याला वाटत होते की जर्मन लोकांची दुर्दशा फक्त तोच संपवू शकतो. त्याचा स्वतःवर असलेला अति विश्वास आणि "फ्युहरर" (नेता) ही संकल्पना यामध्ये त्याच्या स्वकेंद्रिततेचा ठसा दिसतो. हिटलरच्या भाषणांमध्ये तो सतत स्वतःला "अपरिहार्य" म्हणून मांडत असे. त्याने स्वतःच्या जीवनकहाणीला अतिशयोक्तीपूर्ण बनवून जर्मन लोकांमध्ये स्वतःला एक महान नेता म्हणून सादर केले.

सोमवार, २७ जानेवारी, २०२५

भविष्यातील करिअर संधी: तंत्रज्ञान, पर्यावरण आणि समाजिक स्थित्यंतरे

 

भविष्यातील करिअर संधी: तंत्रज्ञान, पर्यावरण आणि समाजिक स्थित्यंतरे

भविष्यातील करिअरच्या संधी या जागतिक तंत्रज्ञान, अर्थव्यवस्था, पर्यावरण, आरोग्य, आणि समाजातील बदलांवर अवलंबून असतील. विज्ञान, तंत्रज्ञान, डिजिटलायझेशन, आणि वैविध्यपूर्ण कौशल्यांची मागणी वाढल्यामुळे अनेक नवनवीन क्षेत्र उभे राहणार आहेत. सदर लेखात आपण भविष्यातील करिअर संधींवर विस्तृतपणे चर्चा करणार आहे, ज्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील संधी, त्यांची आवश्यकता, आणि त्यासाठी लागणाऱ्या कौशल्यांचा समावेश आहे.

भारतीय स्वातंत्र्यानंतर शिक्षण व करिअर क्षेत्रातील महत्त्वाचे बदल

 

भारतीय स्वातंत्र्यानंतर शिक्षण व करिअर क्षेत्रातील महत्त्वाचे बदल

भारतीय स्वातंत्र्यानंतर शिक्षण आणि करिअरच्याच्या क्षेत्रात घडून आलेले बदल हे भारताच्या सामाजिक, आर्थिक, आणि सांस्कृतिक प्रगतीचे परिपूर्ण दर्शन घडवतात. या बदलांना समजून घेण्यासाठी आपणास स्वातंत्र्यनंतरच्या भारताच्या शिक्षण क्षेत्रातील महत्वाच्या टप्प्यांचा आढावा घेता येईल. त्यात शिक्षण व्यवस्था आणि करिअर क्षेत्रामध्ये देखील अनेक महत्त्वाचे बदल झाले. विविध टप्प्यांमध्ये शिक्षण प्रणाली, संधी, आणि करिअरच्या बाबतीत भारतीय समाजाने खूप प्रगती केली आहे.

शुक्रवार, २४ जानेवारी, २०२५

भारतीय शिक्षण व्यवस्थेतील खाजगीकरण: शिक्षणसम्राटांचे वर्चस्व

 

भारतीय शिक्षण व्यवस्थेतील खाजगीकरण

विकसित देशांमध्ये शिक्षण हा प्राथमिक हक्क मानला जातो. प्रत्येक व्यक्तीला दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी सरकार आणि खाजगी क्षेत्र मोठ्या प्रमाणावर योगदान देतात. शिक्षण प्रक्रियेतील सुधारणा करणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शिक्षणामध्ये समाविष्ट करणे हा त्यांचा प्राथमिक उद्देश असतो. म्हणून शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणूक केली जाते. त्यामुळे बेरोजगारी कमी होते आणि रोजगाराच्या अधिक संधी निर्माण होतात. शिक्षणामुळे समाजात समानतेची भावना निर्माण होते आणि गरीब-श्रीमंत दरी कमी होते. शिक्षण हे स्त्री-पुरुष समानतेला प्रोत्साहन देणारे असते.

भारताला विकसित देश म्हणून स्थान मिळवायचे असेल तर शिक्षण ही समाजाच्या प्रगतीची अत्यावश्यक बाब मानली पाहिजे. भारतात शिक्षणाला ऐतिहासिक महत्त्व असून, ज्ञानाच्या प्रसारातून समाजात परिवर्तन घडवले गेले आहे. परंतु आजच्या घडीला शिक्षण व्यवस्थेवर खाजगीकरण आणि शिक्षणसम्राटांचा प्रचंड प्रभाव आहे. शिक्षण क्षेत्र हे केवळ नफ्याच्या दृष्टिकोनातून पाहिले जात आहे, ज्यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षण दुर्लक्षित होत आहे.

मंगळवार, २१ जानेवारी, २०२५

इयत्ता 12 वी नंतर करिअर निवड: अभ्यासक्रम, पात्रता, आणि प्रवेश परीक्षा | Entrance | NEET | CET

 

इयत्ता 12 वी नंतर करिअर निवड: अभ्यासक्रम, पात्रता, आणि प्रवेश परीक्षा

भारतामध्ये इयत्ता 12 वी नंतर प्रवेश घेण्यासाठी विविध कोर्सेस आणि त्यासाठी लागणारी पात्रता यांची माहिती विविध राज्यांमध्ये आणि राष्ट्रीय स्तरावर वेगवेगळी असू शकते. विशेषतः महाराष्ट्र राज्यामध्ये विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या कोर्सेसची निवड करता येते. खाली दिलेल्या माहितीमध्ये महाराष्ट्रातील इयत्ता 12 वी नंतर असलेल्या मुख्य प्रवेश परीक्षा आणि त्यासाठी आवश्यक असलेली पात्रता याविषयी माहिती दिलेली आहे.

मेडिकल (MBBS/ BHMS/ BAMS/ BDS)

भारतात, विशेषतः महाराष्ट्रात, मेडिकल क्षेत्रात प्रवेश घेण्यासाठी NEET (National Eligibility cum Entrance Test) ही मुख्य प्रवेश परीक्षा आहे. MBBS (Bachelor of Medicine and Bachelor of Surgery) आणि BDS (Bachelor of Dental Surgery) या दोन प्रमुख वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना 12 वी मध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र (PCB) विषयांसह उत्तीर्ण व्हायला हवे. मेडिकल क्षेत्रात करिअर करण्यासाठी यातील पात्रता आणि कठोर प्रवेश परीक्षा आवश्यक आहेत. NEET परीक्षेतील उच्च गुणांनुसार विद्यार्थ्यांना सरकारी व खाजगी कॉलेजेसमध्ये प्रवेश मिळतो. मेडिकल क्षेत्राच्या शिक्षण पूर्ण केल्यावर डॉक्टर किंवा दंतवैद्य यांची भूमिका असू शकते.

शनिवार, १८ जानेवारी, २०२५

स्टॉईसिझम: जीवनाचे कठीण क्षण शांतपणे आणि विवेकबुद्धीने जिंकण्याचे तत्त्वज्ञान

 

स्टॉईसिझम: जीवनाचे कठीण क्षण शांतपणे आणि विवेकबुद्धीने जिंकण्याचे तत्त्वज्ञान

जीवन जगणं सोपं नसतं, ते सोपं करावं लागतं.

थोडं संयम ठेवून,

थोडं सहन करून,

खूप काही दुर्लक्ष करून,

बरचस कठोर परिश्रम करून,

आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन.

स्टॉईसिझम ही एक प्राचीन ग्रीक-रोमन तत्त्वज्ञान प्रणाली आहे, जी मुख्यतः जीवनातील प्रतिकूल परिस्थितींचा सामना शांतपणे आणि विवेकबुद्धीने करण्याचे महत्त्व शिकवते. या प्रणालीत अंतर्गत, एक व्यक्ती त्याच्या भावना आणि बाह्य परिस्थितींवर नियंत्रण ठेवण्याऐवजी, आपल्या अंतर्गत विचारांवर आणि क्रियांवर लक्ष केंद्रित करायला शिकविते.

स्टॉईस तत्त्वज्ञानाचे उद्दिष्ट म्हणजे "यूडेमोनिया" (सुख आणि समाधान) मिळवणे होय. हे व्यक्तीच्या आंतरिक सद्गुणांवर, नीतिमूल्यांवर आणि विवेकबुद्धीवर आधारित असते.

शुक्रवार, १७ जानेवारी, २०२५

मानसोपचार: मानसिक आरोग्याची गुरुकिल्ली

 

मानसोपचार: मानसिक आरोग्याची गुरुकिल्ली

समुपदेशन (Counselling) आणि मानसोपचार (Psychotherapy) हे दोन्ही मानसशास्त्रीय सेवांच्या प्रमुख प्रकारांपैकी आहेत, ज्यांचा उद्देश मानसिक आरोग्य सुधारणे हा असतो. तरीही, त्यांच्यात काही महत्त्वाचा फरक आहे.

समुपदेशन प्रामुख्याने अल्पकालीन आणि विशिष्ट समस्यांवर केंद्रित असते, जसे की करिअर मार्गदर्शन, वैयक्तिक ताण-तणाव, किंवा संबंधांतील तणाव. मानसोपचार दीर्घकालीन असते आणि गंभीर मानसिक विकारांवर, जसे की नैराश्य, चिंता, किंवा व्यक्तिमत्त्व विकारांवर, उपचार करण्यासाठी उपयोगी असते.

गुरुवार, १६ जानेवारी, २०२५

मिथ्या विज्ञानाच्या पद्धती आणि त्यांचे समाजावर होणारे परिणाम

 

मिथ्या विज्ञान

गॅलिलिओ गॅलीली (1564–1642) हे आधुनिक विज्ञानाचे जनक मानले जातात. त्यांनी वैज्ञानिक पद्धतींचा वापर करून खगोलशास्त्र, भौतिकशास्त्र, आणि गणितीय सिद्धांतांचा विकास केला. त्यांच्या काळात, चर्चच्या प्रभावामुळे अनेक मिथ्या वैज्ञानिक विचारसरणी प्रचलित होत्या, जसे की पृथ्वी विश्वाचा केंद्रबिंदू आहे (जिओसेंट्रिक मॉडेल). या समजुतींना गॅलिलिओ यांनी आपल्या कोपर्निकसच्या हेलिओसेंट्रिक मॉडेलद्वारे खंडित केले, ज्यामध्ये सूर्य हे विश्वाचे केंद्र आहे, असा दावा होता.

मंगळवार, १४ जानेवारी, २०२५

हॉटेलिंग: बदलती खाद्यसंस्कृती आणि तिचे प्रभाव

 

हॉटेलिंग: बदलती खाद्यसंस्कृती आणि तिचे प्रभाव

आज सुट्टी असल्याने दुपारची वेळ मी जेवून पेपर वाचत बसलो होतो. घरातील सर्व सदस्य आपल्या-आपल्या कामांत गुंतले होते. मुलांची आई किचनमध्ये काहीतरी काम करत आहे, आणि दोन मुलं आदित्य आणि शौर्य आयतेच गप्पा मारत आहेत.

आदित्य: (खिडकीतून बाहेर पाहत) अरेरे! किती दिवस झाले आपण बाहेरचं काहीतरी खाल्लं नाही. मला ना, खूप दिवसांपासून चायनीज खायची इच्छा आहे.

शौर्य: (त्याच्या बोलण्याला पाठिंबा देत) अगदी बरोबर! मी सकाळपासून आईला सांगतोय की मला चटपटीत काहीतरी हवंय, पण ती काही ऐकतच नाही.

आई: (स्वयंपाक करत त्यांचं बोलणं ऐकते) हो का? सकाळपासून सांगत आहेस? पण मला वाटतं की सकाळीच पोहे आणि चहा खाऊन छान गोड म्हणाला होतास, ‘आई, काय छान केलंयस!’

रविवार, १२ जानेवारी, २०२५

प्रत्येक क्षणाचा आनंद: जीवन जगण्याची कला | Happiness

 

प्रत्येक क्षणाचा आनंद: जीवन जगण्याची कला

समाधान, चांगले जीवन, आणि भविष्याचा वेध यांचा शोध सर्व संस्कृतींच्या केंद्रस्थानी राहिला आहे. यामध्ये मूलभूत अस्तित्वाचा प्रश्न नेहमी विचारला जातो: माणसाला जीवनातून काय हवे आहे? दलाई लामांच्या मते, जीवनाचा मुख्य उद्देश आनंद आहे. आनंद या विषयावरचे प्राचीन काळातील लिखाण हे या विषयाचे पुरावे देतात. उदाहरणार्थ, बौद्ध धर्म, जो सुमारे 2,500 वर्षांपूर्वी सुरू झाला, मानवी दुःख समजून घेणे आणि त्यावर मात करण्याच्या मार्गांवर समर्पित आहे.

पूर्वेकडील परंपरांनी एकत्रितपणे जीवनातील समतोल हा आनंदाचा मुख्य घटक मानला आहे. बौद्ध, हिंदू, योग परंपरा, कन्फ्यूशियनवाद आणि दाओवाद यांसारख्या प्रमुख तत्त्वज्ञान प्रणालींमध्ये शांत मन, समतोल जीवन, आणि इतरांसोबत सुसंवादी नातेसंबंध यावर भर देण्यात आला आहे. बौद्ध धर्म जीवनात समत्व (equanimity) मिळविण्याचा सल्ला देतो आणि सुखलोलुप जीवनशैली व तपस्वी जीवनशैली यांच्यातील मध्यम मार्ग अनुसरण्याची शिफारस करतो. हिंदू विचारांमध्ये आत्मज्ञान (self-realization) जीवनाचा सर्वोच्च दर्जा मानला जातो. जीवनातील द्वंद्वांना (उदा., आनंद-दु:ख, सुख-दु:ख, प्रेम-द्वेष) पार करून जीवनात स्थिर स्थिती (स्थितप्रज्ञ) प्राप्त करणे शक्य आहे. यामध्ये सामूहिक कल्याणाचे महत्त्व मान्य केले गेले आहे.

शुक्रवार, १० जानेवारी, २०२५

गर्दीतील मृत्यूचे पथक: अविवेकाकडे वाटचाल

गर्दीतील मृत्यूचे पथक: अविवेकाकडे वाटचाल

तिरुपती मंदिरातील वैकुंठद्वार दर्शन तिकीट केंद्राजवळ 9 जानेवारी 2025 रोजी झालेल्या चेंगराचेंगरीत सहा जणांचा मृत्यू झाल्यानं गर्दी व्यवस्थापनाबाबत प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. इंटरनॅशनल जर्नल ऑफ डिझास्टर रिस्क रिडक्शन यांनी (IJDRR) प्रकाशित केलेल्या 2013 च्या अभ्यासात असं दिसून आलं की, भारतातील 79 टक्के चेंगराचेंगरीचे ठिकाणे हे धार्मिक मेळावे आणि तीर्थयात्रेची ठिकाणे आहेत. तर विकसित देशांमध्ये बहुतेक चेंगराचेंगरी स्टेडियम, संगीत मैफिली आणि नाईट क्लबच्या ठिकाणी होतात. परंतु भारत आणि इतर विकसनशील देशांमध्ये गर्दीच्या आणि चेंगराचेंगरीच्या बहुतेक दुर्घटना धार्मिक स्थळांवर होतात. यासाठी महाराष्ट्रातील काही ठळक घटना पाहूया.

गुरुवार, ९ जानेवारी, २०२५

मुलांना शिस्त लावणे: व्यक्तिमत्त्व विकासाचा सकारात्मक मार्ग

 

मुलांना शिस्त लावणे: व्यक्तिमत्त्व विकासाचा सकारात्मक मार्ग  

आजच्या स्पर्धेच्या युगात पालक जिंकण्यासाठी धावत आहेत आणि बाहेरची प्रस्थापित व्यवस्था याला मदत करते आहे. अशा वातावरणात मुलाचं ‘मूलपण’ सांभाळण्याचं, जोपासण्याचं, फुलवण्याचं काम जीव तोडून कसं करायचं हा मोठ प्रश्न आजच्या पालकांसमोर उभा आहे. कामातला आनंद, खेळातली मजा, कष्टांचा अनुभव, निर्मितीची गंमत, नात्यांची ऊब, क्वालिटी टाइम, निसर्गाशी नातं, जगण्याचा आत्मविश्वास आणि या सगळ्यांतून मुलांच्या जीवनात उतरणारी मुल्ये कशी जोपासावीत हा पुढचा प्रश्न. आपण पालक म्हणून मुलांना पुढील पाच वाक्ये कधी बोललो आहोत का? माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू हे किती छान केलंस. तुझं मत मला महत्त्वाचं वाटतं. सॉरी बरं का! माझ्या लक्षातच नाही आलं, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आम्ही नेहमी तुझ्या पाठीशी आहोत, सुखातही आणि दु:खातही. पालकत्व हे शास्त्र आहे, कला आहे आणि सतत करत राहण्याचा आनंदाचा ध्यास आहे.

बुधवार, ८ जानेवारी, २०२५

भविष्यातील शिक्षणाची दिशा: ब्लेंडेड अध्ययनाचे महत्त्व

 

भविष्यातील शिक्षणाची दिशा: ब्लेंडेड अध्ययनाचे महत्त्व

डॉ. हावर्ड गार्डनर (मल्टीपल इंटेलिजंस) हे असे म्हणतात की "ब्लेंडेड अध्ययन हे विद्यार्थ्यांच्या विविध बुद्धिमत्तांच्या विकासासाठी महत्त्वाचे आहे. तांत्रिक व पारंपरिक शिक्षण पद्धती एकत्र आणल्यामुळे व्यक्तीचा सर्वांगीण विकास होतो."

शिक्षण प्रणालीतील बदल हे सामाजिक, आर्थिक, आणि तंत्रज्ञानातील प्रगतीसोबत घट्टपणे जोडलेले आहेत. 21व्या शतकात शिक्षण क्षेत्रात एक अभूतपूर्व बदल पाहायला मिळाला आहे, ज्यामुळे शिकण्याच्या पद्धती अधिक सुलभ, किफायतशीर, आणि प्रभावी बनलेल्या आहेत. यामध्ये "ब्लेंडेड अध्ययन" (Blended Learning) ही एक महत्त्वाची अध्ययन पद्धत समोर आली आहे. ब्लेंडेड अध्ययन ही संकल्पना पारंपरिक वर्ग शिक्षण पद्धती आणि डिजिटल शिक्षण पद्धतींचा एक प्रभावी संगम आहे. या पद्धतीमध्ये शिक्षकांचा सहभाग, ऑनलाइन सामग्री, आणि विद्यार्थी यांच्यातील परस्परसंबंध अधिक दृढ होतो.

ब्लेंडेड अध्ययन ही पद्धत विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या गतीने शिकण्याची संधी देते. यामध्ये पारंपरिक शिक्षण आणि तंत्रज्ञानाची सांगड घालून वैयक्तिक शिकण्याचा अनुभव अधिक समृद्ध केला जातो. 21व्या शतकातील विद्यार्थ्यांसाठी, ब्लेंडेड अध्ययन हे त्यांच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी एक प्रभावी उपाय ठरले आहे. शिक्षणातील हा नव्या तंत्राचा समावेश भविष्यातील शिक्षणासाठी एक नवा दृष्टीकोन प्रस्थापित करत आहे.

मंगळवार, ७ जानेवारी, २०२५

तिशीनंतरही स्पर्धा परीक्षांच्या जंजाळात अडकलेली तरुण पिढी

तिशीनंतरही स्पर्धा परीक्षांच्या जंजाळात अडकलेले तरुण

महाराष्ट्र आणि भारतातील स्पर्धा परीक्षांना दरवर्षी लाखो विद्यार्थी बसतात. उदाहरणार्थ, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांसाठी सुमारे 3.5 लाखांहून अधिक अर्ज येतात, परंतु उपलब्ध पदांची संख्या सुमारे 350 असते, ज्यामुळे निवडीचे प्रमाण 1% पेक्षाही कमी ठरते. पुणे शहर हे स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी एक महत्त्वाचे केंद्र मानले जाते. येथे MPSC आणि UPSC परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 50 हजारापेक्षा जास्त आहे. देशपातळीवर, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नागरी सेवा परीक्षेसाठी दरवर्षी सुमारे 10 लाखांहून अधिक विद्यार्थी अर्ज करतात, परंतु अंतिम निवडीसाठी उपलब्ध पदांची संख्या मर्यादित असते. या आकडेवारीतून स्पष्ट होते की, स्पर्धा परीक्षांसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे, परंतु उपलब्ध पदांची संख्या मर्यादित असल्यामुळे स्पर्धा तीव्र आहे. या एकूण प्रक्रियेत तिशी ओलांडलेल्या तरी परीक्षा देणाऱ्या परमनंट बेकारांच्या जत्थ्यांची समस्या भारतातील सामाजिक, आर्थिक, आणि शैक्षणिक व्यवस्थेशी निगडीत एक गंभीर वास्तव आहे. शिक्षण, बेरोजगारी, आणि स्पर्धात्मक परीक्षांचे दुष्टचक्र यामुळे देशात लाखो तरुण हे वर्षानुवर्षे स्थिर रोजगार मिळवण्याच्या आशेने संघर्ष करत आहेत.

शनिवार, ४ जानेवारी, २०२५

संमोहन : मनोरंजनाची कला की वैज्ञानिक पद्धती | Hypnosis

 

संमोहन : मनोरंजनाची कला की वैज्ञानिक पद्धती

दरवर्षी 4 जानेवारीला जागतिक संमोहन दिवस साजरा केला जातो. संमोहन आणि त्याचे फायदे याबद्दल जागरुकता पसरवण्यासाठी हा दिवस महत्वाचा आहे. भारतासह विविध देशांमध्ये हे वैद्यकीय उपचार अगदी तळातल्या यादीत आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी नेटफ्लिक्सवर स्ट्रेनजर थिंग्ज किंवा 7th सेंन्स हे चित्रपट पाहिले असतील. यात जो संमोहनाचा प्रकार दाखवला आहे, तोही आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती आहे. आपण जे काही ऐकलंय त्याप्रमाणे एखादी व्यक्ती दृष्टीद्वारे समोरच्या व्यक्तीच्या मनावर नियंत्रण मिळवते. मग संमोहीत व्यक्तीच्या अबोध मनाला प्रश्न विचारून माहिती जाणून घेता येते. पण संमोहन म्हणजे नक्की काय? एखाद्या व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीवर नियंत्रण मिळवता येतं का? मनोविकार तज्ञांचं याविषयी काय म्हणणं आहे?

शुक्रवार, ३ जानेवारी, २०२५

कनेक्टिव्हिझम (Connectivism): 21 व्या शतकातील नवीन अध्ययन पद्धती

कनेक्टिव्हिझम (Connectivism): 21 व्या शतकातील नवीन अध्ययन पद्धती

कनेक्टिव्हिझम हा 21 व्या शतकातील एक अत्याधुनिक आणि महत्त्वाची अध्ययन पद्धती आहे, जो विशेषतः डिजिटल तंत्रज्ञानाच्या उदयानंतर उदयास आला. पारंपरिक अध्ययन पद्धती जसे की वर्तनवाद, बोधनिकवाद, व्यवहारवाद, मानवतावाद आणि ज्ञानरचनावाद ह्या अध्ययन प्रक्रिया वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून समजून घेण्यास मदत करतात, यामध्ये शिक्षक-शिक्षार्थी नात्याला विशेष महत्त्व दिले जात असे. परंतु कनेक्टिव्हिझम डिजिटल युगातील वेगाने बदलणाऱ्या ज्ञानाच्या पार्श्वभूमीवर अधिक प्रभावी ठरतो. तसेच कनेक्टिव्हिझममध्ये शिक्षण आणि ज्ञान हे केवळ व्यक्तीगतरित्या नव्हे, तर जागतिक स्तरावर डिजिटल नेटवर्क्सच्या माध्यमातून सामायिक केलेल्या संबंधांमध्ये विकसित होते, हा दृष्टिकोन मांडला जातो.

वास्तव स्वीकारा आणि त्याचा सामना करा | Embrace Reality and Deal with It

  वास्तव स्वीकारा आणि त्याचा सामना करा दोन मित्र प्रवास करत होते. वाटेत काही कारणावरून त्यांचे भांडण झाले आणि एकाने दुसऱ्याच्या गालावर एक ...