उच्च
शिक्षणातील शैक्षणिक कामगिरी मूल्यमापनातील महत्त्वपूर्ण बदल
भारताच्या उच्च शिक्षण व्यवस्थेत
शिक्षकांचे मूल्यमापन हा शिक्षण गुणवत्ता सुधारण्यासाठी एक महत्त्वाचा घटक आहे.
पारंपरिक मूल्यमापन पद्धतीत केवळ संशोधन व प्रकाशनांवर भर दिला जात होता. मात्र, विद्यापीठ
अनुदान आयोग (UGC) ने नव्या Holistic
Teacher Appraisal Norms मध्ये शिक्षकांच्या कार्यक्षेत्राचा NEP-2020 च्या धरतीवर व्यापक
विचार केला असून, अध्यापन, संशोधन, सामाजिक सहभाग, व्यावसायिक
विकास आणि विद्यार्थी-पालक अभिप्राय यासारख्या घटकांचा समावेश करण्यात आला आहे. या नव्या मार्गदर्शक तत्त्वांमुळे शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यास मदत
होईल आणि केवळ संशोधन व प्रकाशनांवर आधारित मूल्यमापनाची पारंपरिक प्रणाली बदलली
जाईल असे त्यात नमूद केलेले आहे.